12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आमच्या महायुतीला सत्ता मिळेल. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. पंचायत समिती निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत २८४ आणि आता ४१० जागा मिळाल्या. १२५ मधील १०५ जागांवर महायुतीचे सभापती होतील. पूर्ण बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजप महायुतीवर, पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. २०१७ साली देखील आम्ही ग्रामीण भागात मुसंडी मारली होती. २0१४, 20१९ आणि 20२४ असेल, ग्रामीण भागात चांगली मजल मारली होती.
भाजप शहरी, निमशहरी पक्ष आहे म्हणून म्हटलं जात होतं. पण भाजप सगळ्या भागात नंबर १ चा पक्ष आहे. हे सिद्ध झालं. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, हा जनतेचा विश्वास आहे. उलट देशात पंतप्रधान मोदी यांनी ज्या प्रकारे ग्रामविकासाचं काम हाती घेतलं. ज्या प्राकारे निधी उपलब्ध करून दिला. विविध योजनांतून सकारात्मक वातावरण तयार झालं. महाराष्ट्र सरकारनं जे कार्य करून दाखवलं. त्यावर जनतेच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. भाजप किंवा मित्रपक्षांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याचाच परिणाम की इतकी मोठी भरारी घेतली आहे.
आम्ही जिंकतो, आनंद आहे. कुणीही पर्मनंट जिंकत नसतो, किंवा पराभव होत नसतो. महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही. आम्हालाही फारसं काही करण्याची गरज नाही. त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी ९ वाजता जे स्टेटमेंट देतात, त्यातून त्यांची मतं कमी करण्याचं काम होतं. ज्याला कुठलाही अर्थ नसतो, सत्यता नसते. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत आहे.
मुळात विरोधकांमध्ये जी लढण्याची जी एक शक्ती पाहिजे, जी इच्छाशक्ती लागते, तिचा अभाव दिसतो. विरोधी पक्षात काम करत असताना जनतेत जाऊन काम करावं लागतं. जनतेचा आवाज बनावा लागतो. विरोधी पक्ष माध्यमात दिसतं. लोकांमध्ये दिसत नाही. जोपर्यंत ते माध्यमांत आहेत, तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही. असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.