जिल्हा परिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार, पाटील फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

NCP Reshuffle Ahead of Zilla Parishad Elections : अकोला राष्ट्रवादी काँग्रेसमधील जिल्हाध्यक्षपदाचा रखडलेला तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असून, मराठा चेहरा म्हणून परिचित संदीप पाटील यांची लवकरच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
NCP Reshuffle Ahead of Zilla Parishad Elections
NCP Reshuffle Ahead of Zilla Parishad Electionssaam tv
Published On: 

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा यांच्या नावाचा समावेश होता. तेव्हापासून मोहम्मद बुद्रूजम्मा हे फरार असून राष्ट्रवादी पक्षाने देखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अर्थातच त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. दरम्यान, अकोला जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद रिकामं आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी कुणाची वर्णी लागते?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदासाठी अकोल्यातून चार जण इच्छुक आहेत. तसा अहवाल देखील स्थानिक पक्षाकडून वरिष्ठांना पाठवण्यात आलंय. यात सर्वाधिक नाव संदीप पाटील यांचं जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. लवकरच या पदावर मराठा चेहरा म्हणून ओळख असलेल्या संदीप पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सुञांकडुन मिळाली आहे. अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष पदावरून मोठी रस्सीखेच सुरू होती. जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती खरंतर खूप आधीच होणे अपेक्षित होते, मात्र पक्षांतर्गत असलेल्या कलहामुळे आणि गटबाजीमुळे हा निर्णय सतत लांबणीवर पडत होता. यामुळे ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे संघटन काहीसे कमकुवत झाले होते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

NCP Reshuffle Ahead of Zilla Parishad Elections
Political News : मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादीला अर्थखातं का दिलं नाही? शिंदेसेनेच्या नेत्याने सांगितलं कारण

मात्र आता वरिष्ठ पातळीवरून या सर्व वादावर पडदा टाकण्यात आल्याचे कळते आहे. आता जिल्हाध्यक्ष पदाचा नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याचे समजते आहे. या पदासाठी अकोल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे बंधू शत्रुघ्न बिडकर आणि मराठा चेहरा म्हणून ओळख असलेले संदीप पाटील हे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींनी अकोल्याचे पक्ष नेतृत्व संदीप पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला,असे कळते आहे.

NCP Reshuffle Ahead of Zilla Parishad Elections
Transfer News : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

संदीप पाटील यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब?

संदीप पाटील हे नाव राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांना चालणारं आहे. त्यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य, ग्रामीण भागातील प्रत्येक गावागावात असलेला दांडगा जनसंपर्क, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका, यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत असतात आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशात ग्रामीण भागावर मजबूत पकड असलेले नेतृत्व पक्षाला मिळणे ही काळाची गरज होती. संदीप पाटील यांच्या नावाने पक्षाला ग्रामीण भागात चांगलं बळ मिळणार असल्याचे कळते आहे. मात्र, असं असलं तरी जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक जण आहेत, ज्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, शत्रुघ्न बिडकर आणि संदीप पाटील यांचा समावेश आहे. आता जिल्हाध्यक्ष पदासाठी कुणाची वर्णी लागते?, हे चित्र लवकर स्पष्ट होणार आहे.

या कारणांमुळे जिल्हा नेतृत्वाचा तिढा अधिक गडद

महायुतीच्या जागावाटपात बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना (शिंदे गट) कडे गेल्यानंतर, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या बंडखोरीमुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. दुसरीकडे त्यानंतर काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा यांच्या नावाचा समावेश होता. पुढे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली. ज्यामुळे अजित पवार गटाच्या जिल्हा नेतृत्वाचा तिढा अधिक गडद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.