Political News : मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादीला अर्थखातं का दिलं नाही? शिंदेसेनेच्या नेत्याने सांगितलं कारण

Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या अर्थखात्यावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
Maharashtra Political News
Maharashtra Political News AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्राच्या अर्थखात्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये चर्चा

  • राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

  • धाराशिव दौऱ्यादरम्यान प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली

राज्यातील अर्थखात्याच्या वाटपावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मात्र, अर्थखात्याचा निर्णय नेमका कधी घेतला जाणार, हे मुख्यमंत्र्यांवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धाराशिव दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्याची मागणी केली जात असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचे सांगितले. सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र, सध्या राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.

Maharashtra Political News
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी निधी उपलब्ध करून देणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. दुष्काळासाठी लागणारा निधी आणि राज्याच्या आर्थिक नियोजनाला प्राधान्य देऊनच हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

Maharashtra Political News
Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोने महागले! १ तोळा आज इतक्या रुपयांनी वाढले; वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला, तरी त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थखात्याबाबत अंतिम निर्णय कधी घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे खाते कधी सोपवले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.