Maharashtra yellow alert for heavy rain today : राज्यात सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी ऊन-सावल्यांच्या खेळादरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, अकोला आणि अमरावती या भागांत मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
पुण्यातील घाटमाथा, अकोला आणि अमरावतीमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र ऊन-सावल्यांच्या खेळासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.
वातावरणातील बदलांचे मुख्य कारण
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानच्या बिकानेरपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड मार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या १३ तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे येत्या काळात राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढू शकतो.
गेल्या २४ तासांतील स्थिती
मागील २४ तासांत कोकणातील डहाणू येथे सर्वाधिक ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच ताम्हिणी घाट परिसरात सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेता हवामान विभागाने नागरिक, विशेषतः शेतकरी बांधवांना विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.