Maharashtra Rain : राज्यात पुढील ३ दिवस महत्त्वाचे; २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट,वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
MAHARASHTRA MONSOON UPDATE: YELLOW ALERT IN 23 DISTRICTS, HEAVY RAIN AND THUNDERSTORM WARNING
MAHARASHTRA MONSOON UPDATE: YELLOW ALERT IN 23 DISTRICTS, HEAVY RAIN AND THUNDERSTORM WARNINGSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी

  • राज्यातील २३ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

  • पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra Weather Update Today News संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पावसाच्या सरींनी निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, कोकण तसेच राज्यातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD च्या अंदाजानुसार, कोकण विभागात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पालघर, ठाणे, मुंबई (Mumbai Rain Update), रायगड आणि रत्नागिरी (Kokan Rain Update) जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: YELLOW ALERT IN 23 DISTRICTS, HEAVY RAIN AND THUNDERSTORM WARNING
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अनेक भागांत पेरणीसाठी योग्य वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे विविध साथीचे आजार वाढण्याचा धोका असतो.

MAHARASHTRA MONSOON UPDATE: YELLOW ALERT IN 23 DISTRICTS, HEAVY RAIN AND THUNDERSTORM WARNING
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेऊन आरोग्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यभर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने येत्या काही दिवसांत आणखी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com