पुणे, सातारा अन् अहिल्यानगरला अवकाळीने झोडपलं; विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस; शेतकऱ्यांचं उरलं-सुरलं पीकही...

Unseasonal Rain : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले, तर मावळमध्ये वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. सातारा आणि जामखेडमध्येही जोरदार सरी बरसल्या.
MAHARASHTRA WEATHER UPDATE: Maharashtra Weather
MAHARASHTRA WEATHER UPDATE: saam tv
Published On: 

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल झालाय. अर्णबनंतर आणखी एक चक्रीवादळ घोंगावत आहे, त्याचा परिणाम काही राज्यात झालाय. महाराष्ट्रातीलही वातावरणात मोठा बदल झाला असून दोन दिवसांपासून काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पुणे, साताऱ्यासह अहिल्यानगरमध्ये आज मॉन्सूनोत्तर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धावपळ झाली.

आज काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात अचानक आलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले असून आयटीयन्सची चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे मावळ, सातारा आणि अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी बरसल्या. एका बाजूला उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारव्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने बळीराजाची चिंता मात्र कित्येक पटीने वाढवली आहे.

पावसामुळे आयटी पार्क परिसरातील रस्ते झाले जलमय

आयटी पार्क हिंजवडी परिसरात आज संध्याकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आयटी पार्क परिसरातील काही रस्ते जलमय झाले आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आज संध्याकाळपासून पिंपरी-चिंचवड शहरात ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात आणि आयटी पार्क हिंजवडी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

मावळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

मावळात मेघगर्जनेसह सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदरच बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने हिरावून नेला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मात्र, या अवकाळी पावसाने राहिलेलं पीकही उद्ध्वस्त करून ठेवले आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: Maharashtra Weather
दोन रुपयांत प्रॉपर्टी, ४० लग्जरी विला अन् कोट्यवधींची कमाई; IAS-IPS नवरा-बायकोच्या आलिशान काळ्या कमाईचा पर्दाफाश

जामखेड शहरात पावसाची दमदार एन्ट्री, बरसल्या जोरदार सरी

गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या जामखेडकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आज जामखेड शहराच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या, तर काही भागात जोरदार सरी बरसल्या. दुष्काळाचा आणि वाढत्या उष्णतेचा सामना करणाऱ्या जामखेडकरांना पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा जाणवू लागला असून, नागरिकांची उकाड्यापासून काहीशी सुटका झाली आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: Maharashtra Weather
१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

साताऱ्यासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

साताऱ्यात पावसाने अचानक जोर धरला असून, सातारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून, रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले आहेत. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, साताऱ्यासह ग्रामीण भागात सध्या पावसाचा जोर कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.