Weather Update : विदर्भासह, मराठवाड्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडांसह जोरदार पाऊस, हवामान खातं काय सांगतं?

Maharashtra Weather Update : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल शुक्रवारी रह्मपुरीत ४५.९ अंश सेल्सिअस इतकं उच्च तापमान नोंदवलं गेलं.
Maharashtra Weather Update Heavy Rain and Strom Warning
Maharashtra Weather Update Heavy Rain and Strom WarningSaam Tv News
Published On

पुणे : गेल्या चोवीस तासांपासून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी वीजांचा कडकडाटासह पावसाचा अनुभव आला आहे. महाराष्ट्रातही पहाटेच्या सुमारास अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून काही भागांना विजांचा आणि वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काल शुक्रवारी ब्रह्मपुरीत ४५.९ अंश सेल्सिअस इतकं उच्च तापमान नोंदवलं गेलं. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आगामी काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Weather Update Heavy Rain and Strom Warning
Pahalgam Terror Attack : पुण्यातील मावळच्या सहा वर्षीय मुलीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद, लेकीच्या वडिलांनी सांगितला थरारक अनुभव; VIDEO समोर

आज शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.

उद्या रविवारी रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update Heavy Rain and Strom Warning
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोहम्मद आमीरने बेधडक पाकिस्तानची लाज काढली, म्हणाला भारतात जाऊन मला आता...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com