Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोहम्मद आमीरने बेधडक पाकिस्तानची लाज काढली, म्हणाला भारतात जाऊन मला आता...

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद आमीरने पाकिस्तानची जगासमोर बेधडक लाज काढली आहे. पण दुसरीकडे त्याने भारताचा देखील उल्लेख केला आहे.
Mohammed Amir on Pahalgam Terror Attack
Mohammed Amir on Pahalgam Terror AttackSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचा आक्रमक गोलंदाज मोहम्मद आमीरने पाकिस्तानची जगासमोर बेधडक लाज काढली आहे. पण दुसरीकडे त्याने भारताचा देखील उल्लेख केला आहे, त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पहलगाम हल्ला होण्याआधीन सारं काही आलबेल सुरु होतं. पण पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर पाकिस्तानने त्याचा साधा निषेधही केला नाही. त्यामुळे हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचं आता समोर येत आहे. पाकिस्तानने आपल्या देशात रेड अलर्ट जारी केला आणि त्यानंतर त्यांनी भारतीयांना देश सोडून जाण्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटमही दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान भारत नेमकं काय करणार? यासाठी घाबरला आहे. पण त्यामध्येच आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद आमीरने पाकिस्तानची लाज काढली आहे.

Mohammed Amir on Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : पुण्यातील मावळच्या सहा वर्षीय मुलीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद, लेकीच्या वडिलांनी सांगितला थरारक अनुभव; VIDEO समोर

सध्याच्या घडीला IPL आणि PSL या दोन्ही स्पर्धा सुरु आहेत. या दोन्ही स्पर्धा सुरु असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मोहम्मदआमीरने एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मोहम्मद आमी म्हणाला की, 'माझ्यासाठी आता भारत महत्वाचा आहे. मला पाकिस्तानमध्ये जाऊन PSL खेळण्यात जास्त रस नाही, पण मला IPL मात्र खेळायची आहे. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांपैकी मी आयपीएलला जास्त प्राधान्य दिलं आहे. IPL खेळणं हे माझं स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरु शकतं, त्यासाठी मी पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा निर्णय घेणार आहे,' असं मोहम्मद आमीर अख्ख्या जगासमोर म्हणाला आहे.

दरम्यान, मोहम्मद आमीर हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोपही झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी त्याने पाकिस्तान सोडलं आणि तो आता ब्रिटनमध्ये राहतो. त्याला ब्रिटनचं नागरिकत्व मिळालं आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानचे क्रिकेटपटू खेळू शकत नाही, असा नियम आहे. पण मोहम्मद आमीरने आयपीएल खेळण्यासाठी आता ब्रिटीश नागरीकत्व मिळवलं आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळू शकतो, पण त्याला बीसीसीआय परवानगी देतं की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Mohammed Amir on Pahalgam Terror Attack
Railway Megablock: पश्चिम रेल्वे मार्गावर ३५ तासांचा मेगाब्लॉक, तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com