Heat Wave Alert
Heat Wave Alert Yandex

Maharashtra Weather: राज्यात तापमानवाढीचा कहर ; डोक्यावर सूर्य येण्याअगोदच तापमान चाळीशी पार

Heat Wave Alert In Mumbai Pune: राज्यामध्ये सध्या तापमानवाढीचा कहर पाहायला मिळतोय. डोक्यावर सूर्य येण्याअगोदरच अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार असल्याचं पाहायला मिळालं आहे.

राज्यामध्ये सध्या तापमान वाढ होत आहे. पुणे, मुंबई शहरांमध्ये (Mumbai Pune Temperature) उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या तापमानवाढीचा कहर पाहायला मिळतोय. डोक्यावर सूर्य येण्याअगोदरच म्हणजेच दुपारी बारा वाजण्याअगोदरच अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार असल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई आणि रायगड यांसारख्या शहरांसाठी एक वेगळी चेतावणी हवामान विभागाने जारी केली आहे. या आठवड्यात उष्णतेची लाट अपेक्षित असल्याचं त्यांनी (Heat Wave Alert In Mumbai Pune) सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाण्यात किमान तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्यातील अनेक शहरांमधील तापमान आज दुपारी बारा वाजण्याअगोदर चाळीस अंशांच्या पुढे असल्याचं समोर (Maharashtra Weather Update) आलं आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे तर उकाड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तापमान वाढीमुळे उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. राज्यात सध्या सूर्य आग ओकत असल्याचं चित्र दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यात सोमवार म्हणजेच १५ एप्रिल आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. त्यादिवशी जिल्ह्यात तापमान चाळीशीपार गेले होते.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Maharashtra Weather) शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. जिल्ह्यातील एकूण सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस (Weather Update) होते.

Heat Wave Alert
Heat Wave: ठाणेकरांसाठी सोमवार ठरला सर्वात उष्ण दिवस; अनेक ठिकाणी पारा चाळीशी पार, रस्त्यांवर शुकशुकाट

पुढील काही दिवसांत विदर्भातील तापमान ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमान देखील ४० अंशांच्या पुढे आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातमध्येही तापमानात मोठी वाढ (Maharashtra Temprature) झाली आहे. नाशिकमध्येही सरासरी तापमान ३९ अंशांवर पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळमध्ये १८ एप्रिलपर्यंत आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, गोवा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये १६ एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (Heat Wave Alert) आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये १६ ते १८ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने उच्च तापमानाला सामोरे जावे लागत आहे.

Heat Wave Alert
Heat Stroke: नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात दीड महिन्यांत आढळले उष्माघाताचे ७७ रुग्ण, ३ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com