Heat Wave: ठाणेकरांसाठी सोमवार ठरला सर्वात उष्ण दिवस; अनेक ठिकाणी पारा चाळीशी पार, रस्त्यांवर शुकशुकाट

Thane Weather News: ठाणेकरांसाठी सोमवार सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेल्याने ठाणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला.
heat wave in Thane
heat wave in Thanesaam tv

16 April Hottest Day in Thane

राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे मुंबईसह ठाण्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. ठाणेकरांसाठी सोमवार सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेल्याने ठाणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. त्यामुळे भरदिवसा ठाण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

heat wave in Thane
Maharashtra Unseasonal Rain: राज्यातील ५ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, शेतपिकांच्या नुकसानीमुळे बळीराजा चिंतेत

सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तापमानाची नोंद झाली. तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यातील एकूण सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके होते.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवत होत्या. दुपारनंतर सूर्य आणखीच कोपल्याने ठाण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. अंगाची लाही लाही होत असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले होते.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाण्यात उन्हाचे चटके (Weather) जाणवत होते. ट्रेन आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या अंगातून नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, पुढील दोन दिवस ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्र किनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्याची गती मंदावल्याने ठाण्यातील तापमानात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना काही महत्वाची कामे असल्यास त्यांनी ती दुपारपर्यंतच उरकून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सोमवारी ठाणे जिल्ह्यात नोंदवले गेलेले तापमान

  • मुरबाड शहर ४३.२ अंश सेल्सिअस

  • बदलापूर ४२.४ अंश सेल्सिअस

  • धसई येथे ४२.१ अंश सेल्सिअस

  • कळवा शहर ४२ अंश सेल्सिअस

  • ठाणे शहर ४१.६ अंश सेल्सिअस

heat wave in Thane
Old Pune Mumbai Highway: बुधवापर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com