Maharashtra Weather Update: धुळे @11°...!विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला; राज्यात आज कसं असेल हवामान, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

Maharashtra Weather Today: राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाचा चटका जाणवणार? उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असून पूर्व विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. धुळे, रत्नागिरीसह पुणे, मुंबई, नागपूर आणि इतर शहरांचे कमाल-किमान तापमान जाणून घ्या.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Updatesaam tv
Published On: 

राज्यात सध्या हवामानात बदल पाहायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असला, तरी राज्यातील इतर भागांत किमान तापमानात वाढ झालीये. त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय. दरम्यान आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार होऊ शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

राज्यात तापमानात होणार बदल

लक्षद्वीपपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे गुजरात आणि आसपासच्या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर वारे वाहतायत. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर गुजरातपर्यंत १.५ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा एक्टिव्ह झाल्याची माहिती आहे. तर उद्या म्हणजेत २९ नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update
Sanjay Raut: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास शपथविधीला उपस्थित राहणार, संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाल्याची माहिती आहे. पण उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा जोर कायम आहे. शुक्रवारी धुळ्यात कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.

याशिवाय निफाडमधील गहू संशोधन केंद्रात १२.६ अंश, गोंदियामध्ये १३.६ अंश, नागपूरमध्ये १३.४ अंश, तर नाशिकमध्ये १४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्या नोंदवण्यात आले. राज्यातील इतर ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे होते.

रत्नागिरीत सर्वाधिक तापमानाची नोंद

एकीकडे उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवत असताना दुसरीकडे राज्याच्या अनेक भागांत उन्हाचा चटका वाढलाय. कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडाही कायम आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरीमध्ये राज्यातील सर्वाधिक ३६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. सांताक्रूझ आणि सोलापूरमध्येही कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेलंय. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं.

आज राज्यात कसं राहणार हवामान?

आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट कायम राहू शकते. त्यामुळे या भागात थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे विभाग आणि परिसर

  • पुणे- कमाल तापमान ३३.५ अंश, किमान तापमान १७.१ अंश

  • अहिल्यानगर- कमाल तापमान ३२.८ अंश, किमान तापमान १९.३ अंश

  • जेऊ- कमाल तापमान ३४.० अंश, किमान तापमान १८.५ अंश

  • कोल्हापूर- कमाल तापमान ३२.२ अंश, किमान तापमान २२.० अंश

  • महाबळेश्वर- कमाल तापमान २७.४ अंश, किमान तापमान १७.४ अंश

  • सांगली- कमाल तापमान ३२.८ अंश, किमान तापमान २१.६ अंश

  • सातारा- कमाल तापमान ३३.७ अंश, किमान तापमान २०.० अंश

  • सोलापूर- कमाल तापमान ३५.९ अंश, किमान तापमान २३.३ अंश

उत्तर महाराष्ट्र

  • धुळे- कमाल तापमान ३३.० अंश, किमान तापमान ११.५ अंश

  • जळगाव- कमाल तापमान ३२.४ अंश, किमान तापमान १६.२ अंश

  • नाशिक- कमाल तापमान ३२.९ अंश, किमान तापमान १४.१ अंश

  • निफाड- कमाल तापमान ३३.१ अंश, किमान तापमान १२.६ अंश

कोकण

  • सांताक्रूझ- कमाल तापमान ३५.० अंश, किमान तापमान १९.० अंश

  • डहाणू- कमाल तापमान ३१.४ अंश, किमान तापमान १८.१ अंश

  • रत्नागिरी- कमाल तापमान ३६.१ अंश, किमान तापमान २२.८ अंश

Maharashtra Weather Update
Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन! लोकसभेच्या जागा ५४३ वरून थेट ८५० होणार? विशेष अधिवेशनात काय घडणार?

मराठवाडा

  • छत्रपती संभाजीनगर- कमाल तापमान ३२.६ अंश, किमान तापमान १८.८ अंश

  • धाराशिव- कमाल तापमान ३०.८ अंश, किमान तापमान १८.० अंश

  • परभणी- कमाल तापमान ३२.७ अंश, किमान तापमान १८.४ अंश

  • परभणी (कृषी)- कमाल तापमान ३२.२ अंश, किमान तापमान १८.० अंश

विदर्भ

  • अकोला- कमाल तापमान ३३.५ अंश, किमान तापमान १८.० अंश

  • अमरावती- कमाल तापमान ३३.४ अंश, किमान तापमान १५.५ अंश

  • ब्रह्मपुरी- कमाल तापमान ३१.४ अंश, किमान तापमान १६.८ अंश

  • बुलडाणा- कमाल तापमान ३२.० अंश, किमान तापमान २०.० अंश

  • चंद्रपूर- कमाल तापमान ३३.० अंश, किमान तापमान १८.० अंश

  • गडचिरोली- कमाल तापमान ३१.८ अंश, किमान तापमान १६.२ अंश

  • गोंदिया- कमाल तापमान २९.५ अंश, किमान तापमान १३.६ अंश

  • नागपूर- कमाल तापमान ३०.६ अंश, किमान तापमान १३.४ अंश

  • वर्धा- कमाल तापमान ३२.० अंश, किमान तापमान १५.४ अंश

  • वाशीम- कमाल तापमान ३२.४ अंश, किमान तापमान १७.४ अंश

  • यवतमाळ- कमाल तापमान ३२.४ अंश, किमान तापमान १५.६ अंश

Maharashtra Weather Update
Stray dog attack: भटक्या कुत्र्याला पाहून धावला, पण हार्ट अटॅकने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

विभागनिहाय सरासरी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • उत्तर महाराष्ट्र- किमान तापमान ११.५ अंश, कमाल तापमान ३३.१ अंश

  • पश्चिम महाराष्ट्र- किमान तापमान १७.१ अंश, कमाल तापमान ३५.९ अंश

  • कोकण- किमान तापमान १८.१ अंश, कमाल तापमान ३६.१ अंश

  • मराठवाडा- किमान तापमान १८.० अंश, कमाल तापमान ३२.७ अंश

  • विदर्भ- किमान तापमान १३.४ अंश, कमाल तापमान ३३.५ अंश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.