

मान्सूनने केरळचा संपूर्ण भाग व्यापला आहे. तमिळनाडूच्या अनेक भागांतही मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत तळ कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने प्रवास करू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Monsoon Update: Rains Likely To Arrive Within Three Days)
महाराष्ट्रातील परिस्थिती सध्याच्या अंदाजानुसार १० ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. त्यावेळी मान्सूनची तीव्रता, पावसाचे वितरण आणि पुढील स्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील सरासरी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ८६ ते ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हा प्राथमिक अंदाज असून मान्सूनच्या पुढील प्रगतीनुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र हे अंदाज अंतिम नसून पुढील काही आठवड्यांतील वातावरणीय बदलांवर परिस्थिती अवलंबून असेल.
राज्यातील अनेक भागांत वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो. वाऱ्यांचा वेग सामान्यपेक्षा अधिक राहू शकतो. हा पाऊस मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या आगमनाशी संबंधित स्वरूपाचा असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.