राज्याच्या तापमानामध्ये सध्या चढ उतार पाहायला मिळत आहे. पुणे, कोकण आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज हवामान विभागाने (Maharashtra Weather Forecast) वर्तविला आहे. सध्या राज्यात दुहेरी हवामान स्थिती अनुभवायला मिळत आहे. उष्णतेमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
पुण्यात दोन दिवसात उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी दुपारी बाहेर पडणं टाळावं, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं (Heat Wave Alert In Pune) आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे इथं ४४ अंश तापमानाची झाली नोंद आहे. शहरातील अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका कायम आहे.
हवामान विभागाने आज राज्यातील पुण्यासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave Alert) दिलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भात भर उन्हात पुढील 24 तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपासून हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मुंबईमध्ये एप्रिलनंतर मेमध्ये देखील तापमानात प्रचंड वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, कमाल आणि किमान तापमान दोन्ही सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता (Rain Alert) आहे. ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सलग तीन दिवस ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंद झाली आहे.
मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, शहरात मे महिन्यात सामान्य कमाल आणि किमान तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची ७५ टक्के शक्यता (Rain Alert In Vidarbha) आहे.२९ एप्रिल रोजी मुंबईत ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे तो शहराचा दशकातील दुसरा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.