Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान

Maharashtra Unseasonal Rain: या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी शेतपिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आज देखील राज्यातील अकोला, बुलडाणा, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.
Maharashtra Unseasonal Rain
Maharashtra Unseasonal RainSaam Tv

राज्यामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झोडपून काढत आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी शेतपिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आज देखील राज्यातील अकोला, बुलडाणा, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.

अकोला -

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिठीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांना अवाकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हवामान खात्याने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर आणि तेल्हारासोबत बार्शी-टाकळी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. एकीकडे वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Unseasonal Rain
Pune University : पुणे विद्यापीठात भोजनगृहात गोंधळ; भाजी आणि चपातीच्या दर्जावरून विद्यार्थी आक्रमक

बुलडाणा -

आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेगाव शहरात मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अनेक झाडे उन्मळून पडल्याने त्यात ३ वाहनांचे नुकसान झाले तर तिघे जण जखमी झाले. तसेच जिल्ह्यातील खामगाव संग्रामपूर परिसरातसुद्धा अवकाळी पाऊस पडत आहे. आता बुलडाण्यात देखीलपावसाला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Unseasonal Rain
Nandurbar Accident: दोन दुचाकींची समोरासमोर धडक; बाइकचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये माळीवाडा शिवारात आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या एका शेतमजुराचा अंगावर वीज पडून मृत्यू झालाय. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. रावसाहेब खंडू निळ असं या शेतमजुराचे नाव असून शेतात कांद्याच्या पिकाची काढणी सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली आणि हे तिघेही जण आंब्याच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. अशाच वीड पडून एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. दरम्यान याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Unseasonal Rain
Raigad Breaking News : खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सोलापूर -

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. मागच्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाला मोठा फटका बसला. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीतील 500 केशर आंब्यांची झाडे जमीनदोस्त झाली. ऐन काढणीला आलेला आंबा मातीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Maharashtra Unseasonal Rain
Amit Shah: ..तोपर्यंत CAAला हात लावू देणार नाही; अकोल्यात अमित शहांचं मोठं विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com