Raigad Breaking News : खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Raigad Fire News : खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल दाखल झाल्या असून आग नियंत्रिक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Raigad Breaking News
Raigad Breaking NewsSaam Digital

खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल दाखल झाल्या असून आग नियंत्रिक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन तास उलटूनही आगीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेलं नाही. कंपनीमध्ये ज्वालाग्रही केमिकलचे ड्रम असल्याने अगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. तसंच केमिकलमुळे स्फोटही होत आहेत. दरम्यान बचाव पथकामार्फत केमिकलचे ड्रम बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रवरा साखर कारखान्याला भीषण आग

अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हा कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे.

Raigad Breaking News
Mahrashtra Politics: फोन टॅपिंग प्रकरण दाबण्यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलं? संजय राऊतांचा दावा

नाशिकमध्ये ST बसला अचानक आग

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर या बसची आग वाढली. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

Raigad Breaking News
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे गटाला ‘गिव्ह अँड टेक' ऑफर, ठाण्याच्या बदल्यात हवी नाशिकची जागा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com