Mahrashtra Politics: फोन टॅपिंग प्रकरण दाबण्यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलं? संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मविआकडून भाजप नेत्यांच्या अटकेचा डाव असल्याचा आरोप केला होता.
Sanjay Raut  On Thackeray  Government
Sanjay Raut On Thackeray Government

Sanjay Raut Comment On Thackeray Government : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केलाय. अटक टाळण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले, असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मविआकडून भाजप नेत्यांच्या अटकेचा डाव असल्याचा आरोप केला होता.. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या आरोपांची दुसरी बाजू मांडलीय.. काय आहे ही बाजू पाहुयात या रिपोर्टमधून.

भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने केली असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. मात्र अटकेचा संबंध फोन टॅपिंग प्रकरणाशी जोडून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना कोंडीत पकडलंय..फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांना अटक होणार होती. याच भीतीमुळे शिंदेंवर दबाव आणून मविआ सरकार पाडल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.

दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांना महायुती सरकारमधील नेत्यांनी फेटाळलंय.. राऊतांच्या आरोपांना महत्व देण्याची गरज नसल्याचं शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी म्हटलंय.

रश्मी शुक्ला आणि फोन टॅपिंग?

  • महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.

  • राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसे यांच्यासह मविआमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते..

  • मविआच्या नेत्यांचं फोन टॅपिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच झाल्याचा आरोप होता.

  • मात्र फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच मविआ सरकार कोसळलं.

  • महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला.

  • मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले.

फोन टॅपिंग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर रश्मी शुक्लांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली. रश्मी शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणातून दिलासा मिळाला असला तरीही फडणवीसांची आरोपांच्या फेऱ्यातून सुटका झालेली नाही. संजय राऊतांनी फोन टॅपिंग प्रकरणाचे धागेदोरे मविआ सरकार कोसळण्यापर्यंत जोडलेत. आता राऊतांनी नव्याने ओपन केलेली फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल शिंदे फडणवीस कशी क्लोज करणार हे पाहण महत्त्वाचं ठरेल.

Sanjay Raut  On Thackeray  Government
Maharashtra Politics: भाजपकडून शिंदे गटाला ‘गिव्ह अँड टेक' ऑफर, ठाण्याच्या बदल्यात हवी नाशिकची जागा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com