Maharashtra Politics:
नाशिक लोकसभेचा महायुतीतील तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावे करण्यात येत आहे. नाशिकच्या जागेवर आमचा दावा अद्यापही कायम असल्याचा पुनरुच्चार छगन भुजबळांनी केलाय. तर दुसरीकडे येत्या दोन दिवसात नाशकातून माझी उमेदवारी जाहीर होईल, अशी माहिती खुद्द हेमंत गोडसेंनी साम टीव्हीला दिलीये. दरम्यान, नाशिकची जागा कुणाची यावरून वाद सुरु असतानाच भाजपने शिंदे गटाला गिव्ह अँड टेकची ऑफर दिल्याची माहिती समोर आलीय.
भाजपने शिंदे गटासमोर गिव्ह अँड टेकची ऑफर ठेवल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आलीय. ठाण्याची जागा घ्या आणि नाशिकची जागा द्या, अशी अट भाजपने शिंदेंसमोर ठेवलीय. म्हणून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे जिल्हा शिवसेनेचा आणि पुढे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला राहिलाय. त्यामुळे ठाण्याच्या जागेवर पाणी सोडणं म्हणजे ठाकरेंविरोधात बॅकफूटवर जाण्यासारखं आहे. दुसरीकडे नाशिकची जागाही 10 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014 आणि 2019 च्या लढतीत हेमंत गोडसेंनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना पाडलं होतं. त्यामुळे नाशिकच्या हक्काच्या जागेवर माघार घेणं शिंदे गटासाठी अवघड झालंय.
दुसरीकडे नाशकात छगन भुजबळांनी माघार घेतली तरीही जागेवरचा दावा सोडलेला नाही अजित पवार गटाकडे खूप उमेदवार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अजित पवार गटाच्या नाशिकवरील दाव्यामुळे शिंदे गटासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे.
दरम्यान, भाजप नेते ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. शिवाय भाजपने आपल्या सर्व्हेचा आधार घेत शिंदे गटाला माघार घ्यायला सांगितलंय. मात्र श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणची जागा धोकादायक झाल्यामुळे ठाण्यातून उतरवण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेवर पाणी सोडणार की, नाशिकच्या जागेवर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.