Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?

Maharashtra Politics: लोकसभा निवडणूक निमित्तानं खानदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आमदार एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला.
एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?
Eknath KhadseSaam Tv

Eknath Khadse:

लोकसभा निवडणूक निमित्तानं खानदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला. खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाच्या सर्व गोष्टी निश्चित केल्या होत्या.

मात्र जवळपास दोन आठवडे उलटले तरी खडसे यांचा अद्याप अधिकृत प्रवेश पार पडू शकलेला नाही. एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेश पक्षातीलच कलहामुळे रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपतर्फे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हापासूनच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली होती. खडसेंनीही त्याला दुजोरा दिला होता. भाजपमध्ये मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय, असेही खडसे यांनी म्हटले होते.

एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?
South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला, या आमदाराला मिळणार तिकीट?

खडसे यांचा प्रवेश होऊ न शकण्यामागे भाजपचे जळगावमधील स्थानिक राजकारण अडसर ठरल्याचे बोलले जात आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यावयाची आहे.

मात्र राज्यातील काही नेत्यांनी खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचे नुकसानच अधिक होणार असल्याचे दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे खडसे यांचा प्रवेश लांबल्याचे समजते. एकेकाळचे मित्र मात्र आत्ता खडसेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचाही खडसेंबाबतचा नाराजीचा सूर कायम आहे.

एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?
South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला, या आमदाराला मिळणार तिकीट?

एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपची 40 वर्षांची साथ सोडली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गतवर्षी अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले होते. आता 3 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपात जाण्याची घोषणा केली आहे. पण आता त्यांचा भाजप प्रवेश रखडल्यामुळे ते यातून कोणता मार्ग काढतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com