Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस महत्वाचे! राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Rain Update Marathwada Pune Mumbai Nashik : राज्यात १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील चांगला पाऊस होवू शकतो.
 मुसळधार पावसाचा इशारा
Rain News in MaharashtraSaam TV
Published On

मुंबई : राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि यलो अलर्ट देण्यात आलाय. यंदा राज्यभरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली हजेरी लावलेली आहे.

'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुणे, सातारा, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तर मराठवाड्यात ते ४ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. १ सप्टेंबरपासून नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून चार दिवसासाठी खालावलेल्या (Maharashtra Weather Forecast Update) जलविसर्गानंतर २ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा धरण-जलविसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावरील पूरस्थिती ही त्या वेळच्या पावसाच्या तीव्रतेवर अवलंबून असेल, असं हवामान विभागाने वर्तवलं आहे.

राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

आजपासून ५ सप्टेंबरपासून पुढील सहा दिवसात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात (Maharashtra Weather ) आलीय. मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील १८ जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सोमवारी २ सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता (Weather) हवामान विभागाने वर्तवविलेली आहे.

 मुसळधार पावसाचा इशारा
Gujarat Rain News: गुजरातमध्ये पावसाचा कहर! आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू, १७८०० जणांची सुटका; प्रशासन अलर्ट

चक्रीवादळाची स्थिती काय?

सप्टेंबरमध्ये १२ ते १६ सप्टेंबर दरम्यान देखील राज्यभरात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात उत्तर पश्चिम बंगालमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्र तयार झालं होतं. त्यानंतर कच्छच्या (Rain Update) किनारी पट्टीवरून अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं. शनिवारी मध्यरात्री ओमानच्या किनार पट्टीवर हे वादळं धडकलं होतं. या चक्रीवादळाचा मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं होतं.

 मुसळधार पावसाचा इशारा
Rain Alert : महाराष्ट्रासह 31 राज्यांमध्ये पुढील 6 दिवस मुसळधार पाऊस; कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com