Vegetable Price Hike Maharashtra : सर्वसामान्यांना मोठा धक्का! राज्यभरात भाजीपाल्याचे दर गगनाला, कोणती भाजी किती महागली?

Maharashtra Agriculture News : मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान होऊन भाजीपाल्याची आवक घटली आहे. नाशिकसह राज्यभर फरसबी, गवारसह अनेक भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत.
Vegetable Price Hike Maharashtra
Vegetable Price Hike Maharashtragoogle
Published On

सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यभरातला मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाचा मोठा फटका भाजीपाला उप्तादनाला बसलाय. कारण या पावसामुळे पीकं खराब झाली आणि बाजारात भाज्यांची आवकही घटली. तर पाऊस ओसरताना मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडलेले पाहायला मिळत आहेत. पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. पुढील माहितीत आपण आधीचे दर आणि नवे दर जाणून घेणार आहोत.

रोजच्या आहारातल्या भाज्या घेणं आता सर्वसामान्यांसाठी कठीण होणार आहे. कारण हे दर दुप्पट झालेले आहेत. कारण जुन महिन्यात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलैच्या सुरुवातीच्या पडलेल्या पावसात शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला पिकवला होता. तर आता राज्यात भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत.

Vegetable Price Hike Maharashtra
EPFO Alert : PF संदर्भात मोठी अपडेट, आजच करा हे महत्वाचं काम; नाही तर भविष्यात नॉमिनिला पैसे मिळणार नाहीत
  • फरसबीचा दर

आधीचा दर १०० ते १२० रुपये

आत्ताचा दर १८० ते २०० रुपये

  • वाटण्याचा दर

वाटण्याचे आधीचा दर १६० रुपये ते १८० रुपये

आत्ताचा दर २२० ते २४० रुपये

  • शेवग्याच्या शेंगा

आधीचा दर ६० ते ८० रुपये

आत्ताचा दर १०० ते १६० रुपये

  • ढोबळी मिरची

आधीचा दर ३५ ते ४५ रुपये

आत्ताचा दर ८० ते १०० रुपये

  • गवारचा दर

आधीचा दर २० ते ३० रुपये

आत्ताचा दर ८० ते १२० रुपये

  • आल्याचा दर

आधीचा दर १५० ते १८० रुपये

आत्ताचा दर २०० ते २८० रुपये

नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ झालीय. रविवारी बाजारसमितीत कोथिंबिरीला जुडीला २१० रुपये भाव मिळालाय. परराज्यात मोठी मागणी असल्यानं सध्या कोथिंबिरीचे भाव वधारलेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे. जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला पिकवला. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसात शेतांमध्ये पाणी साचलेला उभं पीक ही खराब झाली आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे पालेभाज्यांचे दर घसरतील, अशी शक्यता होती.

मात्र मुंबई सह गुजरात मधील सुरत अहमदाबाद सह अन्य शहरांमध्ये कोथंबीरीसह अन्य पालेभाज्यांना मागणी वाढल्याने कोथिंबिरीसह पालेभाज्यांच्या दराने उसळी घेतलीय. सध्या बाजार समितीत कोथिंबीरीच्या जुडीला दोनशे रुपये भाव मिळत असून मेथी, पालक आणि वांगी, ढोबळी, फ्लावर, कोबी, शेवगाचे घर देखील दुपटीने वाढले आहेत. पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहण्याची शक्यता आहे.

Vegetable Price Hike Maharashtra
8th Pay Commission Recruitment : 8 व्या वेतन आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1.80 लाखांपर्यंत मानधन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com