

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरात शोककळा.
राज्य सरकारने आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक रद्द केली.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बारामतीत उपस्थित.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणातही मोठा बदल झालाय. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलंय. उपमुख्यमंत्री बनताच सुनेत्रा पवार यांनी साताऱ्याच्या कराडमधील प्रितीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. तसेच, विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यामुळे मंत्रालयात कधी जाणार अशी चर्चा होती त्यात सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यभरात शोकाकूल वातावरण आहे. बारामतीतही आज पवार कुटुंबीयांच्या सांत्वनसाठी राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार याही बारामतीत आहेत, त्याचदरम्यान सरकारनं मंत्रालयात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते, मात्र उद्याची बैठक होणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
अजित पवारांचे निधन आणि राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्याची मंत्रिमंडळ बैठक होणार नाहीये. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित होणार आहेत, अशी माहितीही सूत्रांकडून मिळालीय.
दरम्यान आज सुनेत्रा पवार या सातारा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अजितदादांटे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीला नोकरी देण्याचा शब्द दिलाय.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. या माध्यमातून विमान अपघातासंदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा होईल, असे ते म्हणालेत. दरम्यान यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मागणी करणार असल्यास आमदार अमोल मिटकरी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.