सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; 'या' चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Maharashtra Solar Energy Project Scam 2026: महाराष्ट्र सौरऊर्जा प्रकल्प २.० मध्ये तब्बल १२२.५८ कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे. चार कंपन्यांविरुद्ध आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले असून महावितरणकडे बँक हमी रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Officials conducting raids at the offices of companies involved in Maharashtra Solar Project 2.0 fraud
Officials conducting raids at the offices of companies involved in Maharashtra Solar Project 2.0 fraudSaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

महाराष्ट्र शासनाच्या सौरऊर्जा वाहिनी २.० निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरप्रकार उघड झाला असून बँक हमी सादरीकरणाद्वारे तब्बल १२२.५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी या संदर्भात नॅकऑफ उज्रा प्रा. लि., NOPL Projects Pvt. Ltd., Integration Indian Power Ltd., NIPL Three Hingoli Pvt. Ltd., Onix Renewable Ltd. आणि संबंधित संचालकांविरुद्ध कारवाई केली.

Officials conducting raids at the offices of companies involved in Maharashtra Solar Project 2.0 fraud
Raj Thackeray : 'सुख पाहता...' राज ठाकरेंनी सांगितली ३७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण, पोस्टमधून दिसली ती तळमळ

महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरऊर्जा वाहिनी २.० प्रकल्पासाठी निवड झालेल्या कंपन्यांनी महावितरणकडे बँक हमी सादर करून वीज खरेदी करार (PPA) केले होते. मात्र, करारानुसार आर्थिक समापन (Financial Closure) न करता बँक हमी रद्द केल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Officials conducting raids at the offices of companies involved in Maharashtra Solar Project 2.0 fraud
Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

या प्रकरणी विविध कलमांन्वये निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाकडून सुरू आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, इंदौर, मध्यप्रदेश, अहमदाबाद व गुजरात येथील संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांवर तसेच आरोपी संचालकांच्या निवासस्थानी एकाचवेळी छापे टाकण्यात आले.

Officials conducting raids at the offices of companies involved in Maharashtra Solar Project 2.0 fraud
Nashik Crime : नाशिकमध्ये खळबळ! ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, २० वर्षीय तरुणाचं हैवानी कृत्य

या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सौरऊर्जा प्रकल्पातील या गैरप्रकारामुळे ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com