

https://saamtv.esakal.com/topic/highwayसमृद्धी महामार्गावर ९ दिवसांचा टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक
९ ते १८ फेब्रुवारीदरम्यान २१ टप्प्यांत रस्ता बंद
‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारणीचे काम
राज्यातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तब्बल ९ दिवसांसाठी महामार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत २१ टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा, तसेच जालना तालुक्यात या गॅन्ट्री उभारल्या जाणार आहेत. या कामासाठी ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत २१ टप्प्यांत वाहतूक बंद असणार आहे. एमएसआरडीसीमार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. किमी ३०० ते किमी ३६५ (नागपूरपासूनचे अंतर) दरम्यान केले जाणार आहे. यात प्रत्येक टप्प्यादरम्यान वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी बंद असणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे थांबविली जाणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संभाव्य वाहतूक कोंडीपासून वाचवण्यासाठी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन MSRDC आणि वाहतूक प्रशासनाने केले. आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, वेळेची योग्य आखणी करा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
गॅन्ट्री उभारणी कामाचे वेळापत्रक
तारीख साखळी क्र. (कि.मी) वाहिनी (बाजू) वेळ
९ फेब्रुवारी ३०० मुंबई दु. १२ ते दु. १
९ फेब्रुवारी ३०० व ३०५ नागपूर दु. ३ ते दु. ४
१० फेब्रुवारी ३०५ व ३०८ मुंबई दु. १२ ते दु. १
१० फेब्रुवारी ३०८ नागपूर दु. ३ ते दु. ४
११ फेब्रुवारी ३१४ व ३१८ मुंबई दु. १२ ते दु. १
१२ फेब्रुवारी ३१८ व ३१९ नागपूर दु. ३ ते दु. ४
१३ फेब्रुवारी ३२५ दोन्ही मुंबई (दु. १२-१)
नागपूर (दु. ३-४)
१४ फेब्रुवारी ३३८ मुंबई दु. १२ ते दु. १
१६ फेब्रुवारी ३३९ दोन्ही मुंबई (दु. १२-१) व
नागपूर (दु. ३-४)
१७ फेब्रुवारी ३५० व ३५९ मुंबई दु. १२ ते दु. १
१७ फेब्रुवारी ३५० नागपूर दु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी ३५९ व ३६५ मुंबई दु. ३ ते दु. ४
१८ फेब्रुवारी ३६५ नागपूर दु. १२ ते दु. १
समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व ठाणे अशी १० जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले गेलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.