​​Nashik Ring Road: विकासाकडे नेणारा रिंगरोड; नाशिक ते तिरुपतीचा १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार १२ तासात

Nashik Ring Road Project: २०२७ च्या कुंभमेळ्यात नाशिक रिंगरोड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नाशिक ते तिरुपती हा रस्ता प्रवास फक्त १२ तासांत पूर्ण होईल.
Nashik Ring Road Project
Nashik Ring Road project aims to ease traffic congestion and boost connectivity ahead of Kumbh Mela 2027.saam tv
Published On
Summary
  • कुंभमेळा २०२७ साठी नाशिक रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा

  • ७७.४० किमी लांबीचा चारपदरी महामार्ग

  • बोगदे, मोठे पूल आणि २५ लहान पुलांचा समावेश

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे, या मेळाव्यात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. यासाठी रिंग रोड प्रकल्प खूप गरजेचा आहे. नाशिक हे धार्मिक, औद्योगिक आणि पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे वाढत्या वाहनांमुळे शहरात तीव्र वाहतूक कोंडी होतेय. तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक राज्यमार्ग नाशिकमधून जात असल्याने रस्ते पायाभूत सुविधांवर ताण येतोय.

कुंभमेळ्यात सात कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ७७.४० किलोमीटरच्या रिंग रोडचा मॅप तयार केलाय. प्रस्तावित वाढवण (तवा)-नाशिक द्रुतगती महामार्ग आणि नाशिक-चेन्नई द्रुतगती महामार्ग यांच्याशी आवश्यक दुवे जोडले जाणार आहेत. या चारपदरी मार्गावर १ हजार मीटर लांबीचा बोगदा, दोन मोठे पूल आणि २५ लहान पुलांचा समावेश असणार आहे.

Nashik Ring Road Project
Kolhapur–Vaibhavwadi Railway : कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे होणार कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा विकास

दरम्यान नाशिकचा रिंग रोड वेळेत तयार करण्यात येणार आहे. शहरातून जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाबरोबरच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तसेच प्रस्तावित नाशिक – सोलापूर-अक्कलकोट महामार्गाला जोडणारा हा रिंग रोड नाशिकची जीवनवाहिनी ठरेल. या मार्गामुळे अगदी तिरुपतीला रस्ते मार्गाने १२ तासांत जाता येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

या रिंग रोडच्या माध्यमातून उद्योगांसाठी जागा तयार होईल आणि नाशिकला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण सगळीकडे जोडण्यास मदत होईल. नाशिकहून अगदी तिरुपतीला रस्ते मार्गाने जायचे असेल तरी १२ तासांत जाता येणार आहे. अशाच पद्धतीने रिंगरोडचे काम होणार असल्याचे माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिलीय. नाशिक ते तिरुपती हे रस्ते मार्गाने साधारणत १३०० किलोमीटरचे अंतर आहे. नाशिक-सोलापूर- हैदराबाद- कुरनूल-कडप्पा-तिरुपती हा मुख्य मार्ग आहे, जो विविध राज्यांमधून जातो. या प्रवासाला साधारणत २० ते २२ तास लागतात.

Nashik Ring Road Project
Vande Bharat Sleeper: 'या' दिवशी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

दुसरीकडे नाशिक – सोलापूर-अक्कलकोट ३७४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी महामार्गाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय. यामुळे नाशिकहून थेट आंध्र प्रदेश गाठण्याचा मार्ग प्रशस्त होईल. या प्रकल्पाने प्रवासाचे २०१ किलोमीटरने कमी होणार असून वेळेचीही मोठी बचत होईल. या महामार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com