PUC Certificate Price : पीयूसीच्या किंमतीत वाढ करा, अन्यथा राज्यव्यापी संपावर जाऊ, फडणवीस सरकारला इशारा

Maharashtra PUC strike news 2025 latest updates : महाराष्ट्रातील पीयूसी केंद्र चालकांनी प्रदूषण प्रमाणपत्राच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच दरवाढीची मागणी होत आहे.
PUC Certificate Price
PUC Centers Owners Association warns of statewide strike in Maharashtra over fee hike demandSaam TV Marathi News
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील पीयूसी केंद्र चालकांची दरवाढीची मागणी जोर धरतेय.

  • मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा.

  • २०२२ मध्ये शेवटची पीयूसी दरवाढ झाली होती.

  • सॉफ्टवेअर अपडेट व उच्च दर्जाचे उपकरणामुळे खर्च वाढला आहे.

  • असोसिएशनने नवे दर निश्चित करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

Maharashtra Puc Certificate Fee Hike Demand : महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण अर्थातच पीयूसीच्या प्रमाणपत्राच्या किंमतीमध्ये वाढ करा, अशी मागणी ऑल महाराष्ट्र पॉल्यूशन अंडर कंट्रोल सेंटर्स ओनर्स असोसिएशनने देवेंद्र फडणवीस सरकारकडे केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर अनिश्चित काळासाठी आंदोलन करण्यात येईल. आम्ही राज्यव्यापी संपावर जाऊ, असा इशारा असोशिएशनकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या २,२०० पीयूसी केंद्रे आहेत. २०२२ मध्ये पीयूसी प्रमाणपत्रामध्ये शेवटची शुल्कवाढ झाली होती.

असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भांडारे यांनी याबाबत टाइम्स ऑप इंडियाला माहिती दिली. ते म्हणाले की, पीयूसी प्रमाणपत्राचे दर वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. इतर राज्यांमधील पीयूसी दराचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडून लवकरच अहवाल मिळेल. त्या रिपोर्ट्सच्या आधारावर नवीन पीयूसी दराबाबत निर्णय घेतला जाईल.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात एक कोटी एक लाख पीयूसी प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यात यावर्षी ७७ लाख पीयूसी प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहे. २०२५ मध्ये पुणे आरटीओने ७.९ लाख पीयूसी प्रमाणपत्रे जारी केली आणि पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाने आतापर्यंत ५ लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, सदर कागदपत्रे नसल्यास १०,००० रुपये दंड आकारला जातो.

PUC Certificate Price
देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी? कारण आलं समोर

पीयूसी प्रमाणपत्राच्या दरात वाढ का? का केली जातेय मागणी? Why is PUC certificate fee hike demanded in Maharashtra?

गेल्या अनेक दिवसांपासून पीयूसी प्रमाणपत्र दरांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पीयूसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल झालेत. गेल्या वर्षी सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले होते. त्यामुळे उच्च दर्जाचे अँड्रॉइड फोन वापरावे लागत आहेत. तसेच, आम्हाला पीयूसी सेंटरवर वाहनाचे पाच सेकंदांचा व्हिडिओसह दोन फोटो काढावे लागतात. हे सर्व एकत्र अपलोड करावे लागतील. या सर्वांमुळे केंद्र मालकांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दरवाढीच्या मागणीने जोर धरला आहे.

पीयूसीच्या किंमतीत वाढ करण्याची मागणीला परिवहन विभागाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. पण आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन करू शकतो. आम्ही संपावर जाण्याचा विचार करत आहेत. याबाबत आमची चर्चा सुरू आहे. लवकरच असोशिएशनकडून निर्णय जाहीर करण्यात येईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आम्ही भेट घेणार आहेत, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही भंडारे म्हणाले.

PUC Certificate Price
Govind Barge case : गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजाचे पाय आणखी खोलात, वाचा सविस्तर

सध्या पीयूसीसाठी किती रूपये मोजावे लागतात ? PUC certificate price list for two wheeler and four wheeler in Maharashtra

राज्य परिवहन विभागाकडून २०२२ मध्ये पीयूसी प्रमाणपत्राच्या किंमतीत वाढ कऱण्यात आली होती. दुचाकी वाहनांसाठी ३५ वरून ५० रुपये करण्यात आले होते. तिनचाकी वाहनांसाठी ७० वरून १०० रुपये, पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी ९० वरून १२५ रुपये आणि डिझेल वाहनांसाठी ११० वरून १५० रुपये असे दर लागू केले होते. पण ही वाढ अपुरी असल्याचे मत पीयूसी केंद्र मालकांचे म्हणणे आहे. पीयूसी कागदपत्राची वैधता इंजिनच्या मेकवर अवलंबून असते - बीएस-IV वाहनांसाठी एक वर्ष आणि बीएस-III वाहनासाठी सहा महिने. दरम्यान, कोणतीही दरवाढ केवळ विभागाच्या परवानगीने करता येईल, अन्यथा कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

PUC Certificate Price
Bone Glue : सर्जरी सोपी होणार, २ मिनिटात तुटलेली हाडं जोडणार, वाचा 'बोन ग्लू' कसं काम करते

किती दरवाढ करण्याची मागणी ? What happens if you don’t have a valid PUC certificate in Maharashtra?

पीयूसी प्रमाणपत्राच्या दरात मोठी वाढ करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. भंडारे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, दुचाकीसाठी पीयूसी कागदपत्र दर १०० रुपये (बीएस-III सहा महिन्यांसाठी वैध) आणि १२० रुपये (बीएस-IV एक वर्षासाठी वैध) करावा. तीनचाकी वाहनांसाठी दर १३० रुपये (बीएस-III सहा महिन्यांसाठी) आणि १५० रुपये (बीएस-IV एक वर्षासाठी) करावेत. चार चाकी वाहनांसाठी २०० रुपये (बीएस-III सहा महिन्यांसाठी) आणि २५० रुपये (बीएस-IV एक वर्षासाठी) करावेत. डिझेल वाहनांसाठी सुधारित शुल्क २५० रुपये (बीएस-III सहा महिन्यांसाठी) आणि ३०० रुपये (बीएस-IV एक वर्षासाठी) करावेत. सध्याचे दर हे खूप कमी आहेत. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही संपावर जाऊ, शिवाय कोर्टातही लढा देण्यास तयार आहोत.

PUC Certificate Price
...तर सरकारमधून बाहेर पडेन, एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा कडक इशारा, नेमकं प्रकरण काय?
Q

पीयूसी म्हणजे काय?

A

पीयूसी (Pollution Under Control) हे वाहनाच्या प्रदूषणाचे प्रमाण तपासून दिले जाणारे प्रमाणपत्र आहे.

Q

सध्या महाराष्ट्रात पीयूसीसाठी किती शुल्क आकारले जाते?

A

दुचाकी ५० रुपये, तिनचाकी १०० रुपये, पेट्रोल चारचाकी १२५ रुपये, डिझेल चारचाकी १५० रुपये असे दर आहेत.

Q

पीयूसी प्रमाणपत्राच्या दरवाढीची मागणी का केली जातेय?

A

सॉफ्टवेअर अपडेट, व्हिडिओ व फोटो अपलोडची अनिवार्यता, उच्च दर्जाचे उपकरण वापरणे यामुळे खर्च वाढला आहे.

Q

असोसिएशनची नवी मागणी काय आहे?

A

दुचाकीसाठी १००-१२० रुपये, तिनचाकी १३०-१५० रुपये, चारचाकी २००-२५० रुपये, डिझेल २५०-३०० रुपये असे नवे दर मागितले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com