Govind Barge case : गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजाचे पाय आणखी खोलात, वाचा सविस्तर

Govind Barge suicide case : गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे! वैराग येथे आरोपी पूजा गायकवाडच्या नावावर जमीन खरेदी झाल्याचे समोर आले. या खरेदीत गोविंद बर्गे स्वतः साक्षीदार असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
Govind Barge Pooja Gaikwad
Govind Barge Pooja Gaikwadx
Published On
Summary
  • गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवे धक्कादायक पुरावे उघड.

  • आरोपी पूजा गायकवाड हिच्या नावावर वैराग येथे पावणे दोन गुंठे जमीन खरेदी.

  • या खरेदीत गोविंद बर्गे स्वतः साक्षीदार होते.

  • जमीन खरेदीची किंमत साधारण ५-७ लाख रुपये होती.

  • पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता.

Pooja Gaikwad accused in Vairag land purchase evidence : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी रोज नवीन नवीन खुलासे होतायेत. या प्रकरणातील आरोपी पूजा गायकवाड हिच्या नावावर बार्शीतील वैरागमध्ये दीड गुंठे जमीन असल्याची माहिती समोर आली. या जमितीची किंमत 5 ते 6 लाख आहे. विशेष म्हणजे या जमीन खरेदी प्रकरणात गोविंद बर्गे साक्षीदार आहे...जमीन खरेदीचा मोठा पुरावा सामच्या हाती लागलाय.

वैराग येथील गोविंद बर्गे यांच्या स्वतःवर गोळी झाडून मारलेल्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. वैराग येथे पाऊणे दोन गुंठे पूजा गायकवाडच्या नावावर असल्याचा समोर आलं. गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या नावावर वैराग येथे पावणेदोन गुंठे प्लॉट नावावर गोविंद बर्गे ही साक्षीदार म्हणून समावेश आहे.

पूजा गायकवाड हिच्या नावावर जमीन केल्यानंतर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांनी सही केली. वैराग येथे सात लाख रुपयांत पावणेदोन गुंठे जमीन नावावर करण्यात आल्याचे समोर आलेय. - पूजा गायकवाड हिच्यासह तिचा भाऊ प्रशांत गायकवाड हा ही साक्षीदार असल्याचं जमीन खरेदी विक्री दस्तकात निष्पन्न झाले आहे.

Govind Barge Pooja Gaikwad
VIDEO : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रक घुसला, ९ जणांचा मृत्यू, २२ जखमी

वैराग पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबर रोजी पूजा गायकवाड हिच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजा गायकवाड हिला सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल दिला होता आणि घर नावावर करण्यासाठी गोविंद बर्गे यांच्याकडे तगादा लावला होता. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पूजा गायकवाड हिची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे. पोलिसांकडून याप्रकरणात पुरावे गोळा कऱण्यात येत आहे.

Govind Barge Pooja Gaikwad
Akola : शेतकर्‍याचा मोबाईल पडला विहिरीत, पठ्ठ्याने बोलावलं आपत्कालीन पथक, २२ तासांचे रेस्क्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com