

ठाकरे गटाची शिवसेना सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी प्रथमच माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली.
विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला.
सचिन अहिरकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामन्य कार्यकर्त्याचा मान वाढवलाय. ते जी जबाबदारी देतील, ती जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. त्यांनी हिरा पारखलं असल्याचं म्हणत सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदे घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. एकनाथ शिंदेंनी मला उपसभापती या पदावर बसण्याचा मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं.शिंदेसोबत जिद्दीनं काम करण्याचा निर्णय घेतलाय, असंही ते म्हणाले.
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदेंनी एखाद्या सामन्य कार्यकर्त्याला ही संधी देणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिंदे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. शिवसेना मी सोडली नाहीये. पक्ष सोडला की नाही या तांत्रिक बाबीवर नंतर बोलेन., असं सचिन अहिर म्हणालेत.
पत्रकाराच्या सचिन अहिर यांनी शिवसेना सोडली का? या प्रश्नाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं. सचिन अहिर जेव्हा आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलं, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आता शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला नाहीये, ते शिवसेनेतच आहेत.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सचिन अहिर यांनी सोडल्यानंतर मुंबईच्या वरळी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चत आलंय. त्यातच ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. "वरळी ही कोणत्याही एका व्यक्तीची नाही, ती शिवसेनेची आहे," असे म्हणत पुढे त्यांनी पक्षातील नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.