Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे वादाला सुरुवात झाली. प्रफुल्ल पटेल यांनी दगा दिल्यामुळे सुनेत्रा पवारांनी त्यांना जोरदार झटका दिलाय.
Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?
Sunetra Pawar NCPSaam Tv
Published On

Summary -

  • राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वादाची चर्चा

  • निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे वादाला सुरुवात

  • पटेलांनी अधिकार वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

  • सुनेत्रा पवारांनी पत्राद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा

भरत मोहोळकर, साम टीव्ही

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दगा दिल्यामुळे सुनेत्रा पवारांनी त्यांना जोरदार झटका दिलाय. पटेलांनी सुनेत्रा पवारांना नेमका काय दगा दिला ? त्यानंतर सुनेत्रा पवारांनी कसा वचपा काढला ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

हे पत्र नीट पाहा... या कार्यकारिणीच्या पत्रात 14 नावांचा उल्लेख आहे.. त्यात दादांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढं कुठल्याच पदाचा उल्लेख नाही. आयोगाला पाठवलेलं पत्र सर्वात आधी साम टीव्हीच्या हाती लागलं आणि सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेलांनी पंख छाटल्याची चर्चा रंगली. मुळात त्याला कारणही तसंच आहे...अजित पवारांनी वर्षभरापूर्वी निवडणूक आयोगाला असंच पत्र पाठवलं होतं. या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या नावापुढं पदांचा उल्लेख केला होता.. आता सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल आणि तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाही.

Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?
NCP controversy : पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीवर ताबा घ्यायचा होता, घटनेत बदल केला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

खरंतर अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला.. त्यानंतर 16 फेब्रुवारीला पटेलांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रवादीच्या अध्यक्षचे समकक्ष अधिकार आपल्याकडे घेण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल केल्याचं उघड झालं आणि त्यांनी दगा दिल्याची चर्चा रंगली... त्यानंतर सुनेत्रा पवारांची दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.. या निवडीनंतर 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारीनंतरचा पत्र व्यवहार रद्द ठरवण्याची मागणी करुन पटेलांना जोरदार धक्का दिला... पटेलांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून घटनेत नेमके कोणते बदल केले होते? पाहूयात...

Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?
Rohit Pawar : महाभागालाच NCP पक्ष ताब्यात घ्यायचा होता, तटकरेंकडून अप्रत्यक्ष रोहित पवारांचा डोमकावळा म्हणून उल्लेख

पटेलांचा सुनेत्रा पवारांना दगा?

कलम 21.1

घटनेनुसार पक्षाच्या दैनंदिन आणि प्रशासकीय कामाची जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची असणार

कलम 23.2

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीवर 10 निमंत्रित सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार

कलम 23.4

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणत्याही राज्यातून कोणालाही सक्रीय सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात

कलम 23.5 A

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना खजिनदाराची नियुक्तीचे अधिकार

कलम 23.5 B

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीतून राष्ट्रीय सरचिटणीसच्या नियुक्तीचे अधिकार

Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर

हे असं असलं तरी आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावरुन पटेलांना हटवल्याची चर्चा खासदार पार्थ पवारांनी फेटाळून लावलीय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंबाबतच्या बातम्या निराधार आहेत. दशकांपासून त्यांची निष्ठा आणि नेतृत्व पक्षासाठी मार्गदर्शक आहे. अशा नेत्यांना तथ्यहीन वादात ओढणं दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांच्या बोलण्यातून मात्र राष्ट्रवादीत नाराजी असल्याचं दिसतंय.

खरं तर पार्थ पवारांनी पटेल आणि तटकरेंबाबतचे दावे फेटाळून लावले असले तरी राष्ट्रवादीत कुणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य़ जागा दाखवण्यात येईल असा खरमरीत संदेशच सुनेत्रा पवारांनी या पत्रातून दिल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगलीय.

Sunetra Pawar NCP: पटेलांकडून दगा, सुनेत्रा पवारांचा फटका? राष्ट्रवादीत पटेलांचे पंख छाटले?
Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com