Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे मोठा वाद निर्माण झालाय. यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नाराज झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर
NCP Rowsaam tv
Published On

Summary -

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला

  • कार्याध्यक्षांच्या अधिकारांवरून मतभेद

  • सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती

  • नेत्यांच्या बैठकीनंतरही वाद कायम

गिरीश कांबळे, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत केलेल्या बदलांवरून मोठा वाद निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या अधिकारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षालाही अधिकार देण्याच्या प्रस्तावाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना चांगलाच फटका बसला आहे. या प्रकरणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या बदलांबाबत नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यांच्या स्पष्टीकरणाने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या बदलानुसार कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव होता. दरम्यान, या पत्रानंतर १० मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र पाठवून तटकरे आणि पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार अमान्य समजावा आणि त्याकडे दुर्लक्ष करावे, अशी मागणी केली. या घटनांनंतर पक्षात मोठे वादंग निर्माण झाले.

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर
राज्यातील राजकारण फिरणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

या पार्श्वभूमीवर, तटकरे आणि पटेल यांची प्रतिमा नकारात्मक होत असल्याची जाणीव झाल्याने दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी वांद्रे येथील MET संस्थेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घटनेतील बदलांबाबत सुनेत्रा पवार यांना सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे ठरवण्यात आले.

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर
Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

यानुसार मंगळवारी तटकरे, पटेल, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या स्पष्टीकरणाने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याचे समजते. या संपूर्ण पत्रव्यवहारानंतर आणि बैठकीनंतरही पक्षातील अंतर्गत मतभेद कायम असल्याचे दिसत असून, पडद्यामागे नेमके काय घडत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर
Rohit Pawar : महाभागालाच NCP पक्ष ताब्यात घ्यायचा होता, तटकरेंकडून अप्रत्यक्ष रोहित पवारांचा डोमकावळा म्हणून उल्लेख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com