Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याचं नगराध्यक्षपद जाणार, नेमकं काय कारण?

Nagpur News : काटोल नगराध्यक्षा अर्चना देशमुख यांचे कुणबी जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. या निर्णयामुळे त्यांच्या नगराध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून काटोलच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ARCHANA DESHMUKH'S CASTE CERTIFICATE CANCELLED; KATOL NAGARADHYAKSHA POST UNDER THREAT
ARCHANA DESHMUKH'S CASTE CERTIFICATE CANCELLED; KATOL NAGARADHYAKSHA POST UNDER THREATSaam Tv
Published On
Summary
  • जिल्हा जात पडताळणी समितीने अर्चना देशमुख यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले

  • कुणबी जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नाही

  • या निर्णयामुळे काटोल नगराध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह

  • नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काटोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना देशमुख यांचं नगराध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. अर्चना देशमुख यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समितीच्या या निर्णयामुळे देशमुख यांच्या नगराध्यक्षपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नगरपालिकेतील सत्तासमीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना देशमुख यांनी ओबीसी आरक्षणातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्या जात वैधतेबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात भाजपच्या उमेदवार कल्पना उमप यांच्यासह अन्य दोघांनी हरकत नोंदवली होती.

ARCHANA DESHMUKH'S CASTE CERTIFICATE CANCELLED; KATOL NAGARADHYAKSHA POST UNDER THREAT
Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

या प्रकरणाची सुनावणी १२ जून रोजी पार पडली. त्यानंतर समितीने उपलब्ध कागदपत्रे, वंशावळ, शालेय दाखले तसेच इतर पुराव्यांची सखोल छाननी केली. सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर समितीने १९ जून रोजी अंतिम निर्णय जाहीर करत अर्चना देशमुख यांचा कुणबी जातीचा दावा अवैध ठरवला आणि संबंधित जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.

ARCHANA DESHMUKH'S CASTE CERTIFICATE CANCELLED; KATOL NAGARADHYAKSHA POST UNDER THREAT
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

समितीच्या निरीक्षणानुसार, अर्जदार तसेच त्यांच्या वडिलांच्या शालेय नोंदींमध्ये ‘मराठा’ अशी जात नमूद असल्याचे आढळून आले. तसेच आजोबांच्या उपलब्ध कागदपत्रांमध्ये कोणतीही जात नोंद स्पष्टपणे नमूद नसल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक आणि ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला.

ARCHANA DESHMUKH'S CASTE CERTIFICATE CANCELLED; KATOL NAGARADHYAKSHA POST UNDER THREAT
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

या निर्णयामुळे काटोल नगराध्यक्षपदासह नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, अर्चना देशमुख या समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील घडामोडींवर संपूर्ण काटोल तालुक्याचे लक्ष लागले आहे. समितीच्या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पुढील कायदेशीर लढत निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com