

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
वरिष्ठ नेत्यांची भेट मिळत नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
सलीम सारंग यांनी पत्राद्वारे नेतृत्वापर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दादांच्या निधनानंतर पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यावरून पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नेत्यांची कानउघडणी देखील केली होती.
अजितदादांच्या निधनाला पाच महिने झाले असून पक्षातील त्यांची पोकळी अजूनही भरून निघाली नाहीये. कार्यकर्त्यांना पक्षातील वरिष्ठ नेते भेट नसल्याची खदखद कार्यकर्त्यांकडून बोलून दाखली जातेय. वरिष्ठ नेत्याची भेट मिळत नसल्यानं सलीम सारंग यांनी पत्रातून आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
अजित पवार यांचे निधन झाल्यापासून पक्षात मोठा बदल झाला आहे. नेतेमंडळी कार्यकर्त्यांना भेट देईना झालेत. आपली कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांना नेतेमंडळींचा अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीयेत, ना त्यावर व्यवस्थित कोणी पाठपुरावा करत आहे, यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सलीम सारंग यांनी यावर पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याने आपल्याला फरक पडला आहे. अजितदादांची कमी भासत असल्याचं सांरग यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
दादा, तुमच्या जाण्याने मला फरक पडलाय!
आज तुम्हाला जाऊन पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र दिवसेंदिवस अधिक जाणवते आहे. दादा, तुम्ही आमच्यासाठी फक्त पक्षाचे नेते नव्हतात, तर कार्यकर्त्यांचा विश्वास होता. कोणतीही अडचण आली की, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही विनंतीची गरज न्हवती. मात्र आता स्वतःची ओळख सांगावी लागते, भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, अनेकदा विनंती करावी लागते आणि एवढं करूनही उत्तर मिळत नाही.
तुमच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचं की, "माझ्या पाठीशी माझा नेता आहे." आज ती भावना हरवत चालली आहे.कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि संवाद याकडे पूर्वीसारखं लक्ष दिलं जात नाही, ही खंत मनात कायम आहे. बैठका होत नाहीत, संवाद कमी झाला आहे, आणि कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचतोय की नाही, हा प्रश्न पडू लागला आहे.
दादा, पाच महिने झाले... पण तुमच्या जाण्याने पडलेली ही उणीव आजही भरून निघालेली नाही. तुमच्यासारखा कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा, त्याला वेळ देणारा आणि त्याच्या पाठीशी निस्वार्थपणे उभा राहणारा नेता आज खूप मिस होतो.
दादा, तुमच्या जाण्याने फक्त एक नेता गेला नाही... कार्यकर्त्याला 'आपलं' म्हणणारा माणूस हरपला आहे.
दादा तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र आदरांजली !
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.