NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

NCP MLA Sunil Shelke: EVMच्या खरेपणावर कायम संशय व्यक्त होतोय. मारकडवाडीच्या ग्रामस्थांपासून ते थेट उद्योगपती एल़ॉन मस्कपर्यंत सर्वांनीच EVM हॅक होऊ शकतं असं म्हटलंय. आता तर एका आमदारानेच EVMवर 'ओम फट स्वाहा' केलंय. पाहूया कोण जादूटोणा करतोय ? या स्पेशल रिपोर्टमधून.
NCP MLA Sunil Shelke
NCP MLA Sunil Shelke claims he can hack EVMs using black magic — says “Om Phat Swaha” makes EVMs obey himsaam tv
Published On
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने खळबळ.

  • “मी जादूटोणा करतो, ईव्हीएम हॅक करतो” असं वादग्रस्त विधान केलं.

  • “ओम फट स्वाहा” म्हणत ईव्हीएम वश केल्याचा दावा आमदारांनी केला.

ऐकलंत. ओम फट स्वाहा करणारे हे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके.नुसताच मंत्र म्हणून ते थांबले नाहीत तर जादूटोणा करुन ईव्हीएम हॅक करतो, असा दावाही केलाय. ज्या EVM म्हणजेच मतदान यंत्रावरुन देशभरात विरोधकांनी आरोपांची राळ उठवली आहे. ते ईव्हीएम शेळकेंना वश झालंय. म्हणूनच आगामी निवडणुकीत आपले उमेदवार शंभर टक्के विजयी होणार अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

शेळकेंच्या या कॉमेडीवर हशा पिकला.टाळ्या पडल्या. मात्र विरोधकांना ध़डकी भरलीये कारण वडगाव मावळ येथे राष्ट्रवादीच्या बैठकीत शेळके फक्त मंत्र मारून थांबले नाहीत तर त्यांनी मित्रपक्ष भाजपलाही थेट आव्हान दिलंय. निवडणुकीत एकही जागा महायुतीला देणार नाही आणि त्यातही भाजपला तर नाहीच नाही, असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

NCP MLA Sunil Shelke
Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांचं ईव्हीएम विरोधातलं आंदोलन चांगलंच गाजलं होतं. सगळ्या विरोधकांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.त्यामुळे शेळकेंनी केलेलं ओम फट स्वाहा अगदीच हलक्यात घेऊ नका. आगामी निवडणुकीत मावळमधील त्यांचा जादूटोणा किती यश देतोय ते पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com