प्रमोद जगताप, प्रतिनिधी
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला राष्ट्रवादी सत्ता संघर्षाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. यावर निवडणूक आयोगात होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबतची महत्वाची बातमी समोर आली असून आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला.
शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप..
राष्ट्रवादी कुणाची? याबाबत निवडणूक आयोगासमोर (Election Commission) महत्वाची सुनावणी पार पडत आहे. निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडताना अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेत पक्ष आपल्याच असल्याचा दावा केला.
काय आहेत अजित पवार गटाचे दावे...
अजित पवार (Ajit Pawar) गटाने निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडताना शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा गंभीर आरोप केला. जयंत पाटील (Jayant Patil) यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असेही या गटाने म्हटले आहे.
संख्याबळ आमच्याकडेच...
तसेच यावेळी अजित पवार गटाकडून संख्याबळही आमच्याकडेच आहे, हे सुद्धा आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील 5 पैकी 1 व राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.