29 महापलिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आणि दुसरीकडे सत्ताधारी भाजपने कारवाईचा बडगा उगारत नाशिकमधील तब्बल 76 जणांची हकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत संघर्ष उफाळून येताना दिसला. उपऱ्यांना तिकीट दिल्याने निष्ठावंतांनी बंडखोरी करत थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतला.
तर बी फॉर्मवरून गाडीचा सिनेस्टाईल केलेला पाठलाग आणि फार्म हाऊसचे गेट तोडल्याने शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या भाजपमधील बेशिस्तपणा अवघ्या राज्याने बघितला. याच निष्ठवंतांना डावलल्याने भाजप आमदार देवयांनी फरांदे यांना देखील अश्रु अनावर झाले होते.
मात्र या बंडांना थंड करण्यासाठी दस्तुरखुद्द संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे शहरात तळ ठोकून होते. त्यांना देखील यामध्ये यश मिळाले नाही, अखेर मंगळवारी (दि13) रोजी माजी महापौरांसह, माजी सभापती, माजी सभागृह नेते यांच्यासह 54 माजी नगरसेवकांची हकालपट्टी केली गेली. आज आणखी 22 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली आहे.
पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या 76 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सदर संबंधित व्यक्तींना भारतीय जनता पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.
हकालपट्टी करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी खालीलप्रमाणे आहे :
कमलेश बोडके, अमित घुगे, सतिष ( बापू ) सोनवणे, पुनम सोनवणे, रुची कुंभारकर, अशोक मुर्तडक, सुनिता पिंगळे, शशिकांत जाधव, मिरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडीत आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, जितेंद्र चोरडीया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दिक्षीत, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, जहागीरदार नवाबखान, कैलास अहिरे, सतनाम राजपुत, गणेश मोरे, किरण गाडे, संदिप (अमोल) पाटील, मंगेश मोरे, शालीग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगीता राऊत, अनंत औटे, ॲड.मिलींद मोरे, राजश्री जाधव, साक्षी गवळी, चंचल साबळे, यमुना घुगे, बाळासाहेब घुगे, शिला भागवत, शंकर विधाते, प्रेम पाटील, राहत बेगम अहमद रजा काझी, वंदना मनचंदा, रत्ना सातभाई
यमुना वराडे, संजय गायकवाड, ऋषिकेश शिरसाठ, गिता वाघमारे, गुलाब माळी, सविता गायकर, नंदिनी जाधव, राहुल कोथमिरे, प्रमिला मैंद, शितल साळवे, कन्हैया साळवे, तुळशी मरसाळे, तुषार सोळुंखे, दिलीप दातीर, शिला भागवत, तुळशिराम भागवत, सागर देशमुख, सोनाली नवले, एकनाथ नवले यांचा समावेश आहे. हकालपट्टी झालेल्यांमध्ये माजी महापौर, माजी सभागृह नेते,माजी नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.