माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात कोण होणार महापौर? चार महिला नेत्यांची नावे चर्चेत

Nanded Municipal Corporation Mayor Bjp Women: नांदेड महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळतेय. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे चार महिला नगरसेविकांची नावं चर्चेत आहेत.
Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.
Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.Saam Tv
Published On

संजय सुर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड महापालिकेत 81 पैकी 45 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. आज आरक्षण सोडतीत नांदेड माहापलिकेचे महापौर पद सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. भाजपकडून सर्व साधारण महिला प्रवर्गातून एकुण 12 उमेदवार निवडून आले. त्यापैकी चार जणांची नावं महापौर पदासाठी स्पर्धेत आहेत. ज्योती कल्याणकर, सुदर्शना खोमने, वैशाली देशमुख आणि कविता मुळे या चार जणांची नावे सद्या चर्चेत आहेत.

Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.
Solapur Mayor Reservation : देशमुख, काळे की जाधव, सोलापूरचा महापौर कोण? भाजप धक्कातंत्र वापरणार, पाहा कुणाच्या नावाची चर्चा

ज्योती कल्याणकर ह्या प्रभाग क्रमांक १ मधून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. यापूर्वी कल्याणकर ह्या काँग्रेसमध्ये होत्या, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योती कल्याणकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांनी कल्याणकर यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक १ मधून तिकीट दिले आणि त्या निवडून आल्या आहेत. सर्वसाधारण महिलासाठी महापौर आरक्षण जाहीर झाल्याने कल्याणकर या पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत.

Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.
Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

सुदर्शना खोमणे ह्या प्रभाग क्रमांक १० मधून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती महेश उर्फ बाळू खोमणे हे राजकारणात सक्रिय आहेत. बाळू खोमणे हे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असून माजी विरोधी पक्ष नेता म्हणून देखील त्यांना महापालिका कारभाराचा अनुभव आहे. भाजपमध्ये बाळू खोमणेंचं वजन पाहता महापौर पदाची माळ त्यांच्या पत्नी सुदर्शना खोमणे यांच्या गळ्यात पडू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.
BJP–AIMIM Alliance : भाजप-एमआयएमची पुन्हा अभद्र युती, सत्तेसाठी भाजपचा नवा डाव, कुणाला कोणतं पद मिळाले?

वैशाली देशमुख ह्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आल्या आहेत. महापालिका सभागृहात जाण्याची ही दुसरी वेळ आहे. या पूर्वी देखील त्यांनी भाजपकडून याच प्रभागातून निवडून आल्या होत्या. त्यामुळे वैशाली देशमुख यांना देखील महापौर पदाची लॉटरी लागू शकते.

Four BJP women corporators emerge as strong contenders for the Nanded Mayor post.
ZP Election : बापाचे झेडपीचं तिकिट कापलं, मुलाचा किळसवाणा प्रकार, अजित पवारांच्या आमदाराच्या कार्यालयाबाहेर लघवी

कविता मुळे ह्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपकडून निवडून आल्या आहेत. त्यांना नगरसेवक पदासाठी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. महापालिका स्थायी समितीच्या सदस्य म्हणून त्यांना संधी मिळाली होती. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून कविता मुळे यांची ओळख आहे. त्यामुळे कविता मुळे यांना भाजपाकडून महापौर पदाची लॉटरी लागू शकते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com