Maharashtra Politics: अशोक चव्हाण दीड वर्षांनंतर काँग्रेस मंचावर, नेमकं काय घडलं? VIDEO
अशोक चव्हाण तब्बल दीड वर्षांनी काँग्रेसच्या मंचावर
वसंतराव चव्हाण पुतळा अनावरण सोहळ्याला हजेरी
भाजप खासदार असूनही काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थिती
जिल्ह्यात आणि राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण
नांदेडमध्ये आज एक वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तब्बल दीड वर्षांनी पुन्हा काँग्रेसच्या मंचावर दिसले. निमित्त होतं माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा. या कार्यक्रमात काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक चव्हाण सध्या भाजपचे खासदार असून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम केला होता. मात्र आज काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावताच जिल्ह्यात आणि राज्यभरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी अशोक चव्हाण आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये मंचावर गप्पा देखील रंगल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसमध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या आणि वसंतराव चव्हाणांचे निकटवर्तिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक चव्हाणांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली. काँग्रेस सोडल्यानंतर ते प्रथमच या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.