BJP–AIMIM Alliance : भाजप-एमआयएमची पुन्हा अभद्र युती, सत्तेसाठी भाजपचा नवा डाव, कुणाला कोणतं पद मिळाले?

BJP–AIMIM Alliance : अकोल्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि एमआयएमची अभद्र युती समोर आली आहे. या युतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

BJP AIMIM alliance news : अकोल्यातील अटोकमध्ये भाजप आणि एमआयएमच्या युतीने राज्यात खळबळ उडाली होती. नागरिकांचा संताप आणि विरोधकांच्या भूमिकेमुळे भाजपकडून हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा भाजप एमआयएमच्या या अभद्र युतीचा नवा अंक सुरू झाला आहे. अमरावतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि एमआयएमकडून युती करण्यात आली आहे. या युतीनंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला जोर धरलाय. विरोधकांकडून या युतीवर टीका करण्यात आली आहे. भाजपकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजप-एमआयएम
देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ मिळाली आहे. एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळालेय. एमआयएमच्या 3 , अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत जात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजप-एमआयएम
Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com