Maharashtra Politics: महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू, नाना पटोलेंचा संकल्प

Sangli News: या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, बाळासाहेब थोरात यांचे आवाहन.
Nana Patole Attack on BJP
Nana Patole Attack on BJPsaam tv
Published On: 

Nana Patole Attack on BJP: कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला आव्हान दिले आहे. सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर काँग्रेसचा महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी हा संकल्प व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले, भाजपा आपल्या देवीदेवतांचा वापर फक्त निवडणुकीत मतं मागण्यासाठी करतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम आणि बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम आणि हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपुरात जागोजागी पोस्टर लावले आणि त्यातही पांडुरगांचा अपमान केला. पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, असे देखील नाना पटोले म्हणाले.

Nana Patole Attack on BJP
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका, सिद्धरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा संकल्प - नाना पटोले

ते म्हणाले, छत्तिसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहेत, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या, आरक्षण संपवले.

धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते, पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे नाना पटोले म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकवू - थोरात

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील यावेळी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली, त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. (Latest Political News)

Nana Patole Attack on BJP
Viral Video: जीवाची पर्वा न करता तरुणांनी पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

सीमावासीयांबाबत काळजी घ्या - थोरात

महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत. पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com