Viral Video: जीवाची पर्वा न करता तरुणांनी पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Woman Rescued By Locals: प्रचंड पुराच्या प्रवाहातून तरुणांनी महिलेला वाचवल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Youth Saves Woman From Flood  In Haryana
Youth Saves Woman From Flood In HaryanaSAAM TV
Published On

Youth Saves Woman From Flood In Haryana: हरियाणाच्या पंचकुलामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावामुळे अनेक ठिकाणी नदी आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरात अडकलेल्या एका महिलेची काही स्थानिक नागरिकांनी सुटका केली आहे. प्रचंड पुराच्या प्रवाहातून तरुणांनी महिलेला वाचवल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी मान्सून पूर्वत तर काही ठिकाणी मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडला. या पावसात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

Youth Saves Woman From Flood  In Haryana
Marathi Sahitya Sammelan: मोठी बातमी! ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

अशाच एका घटनेत हरियाणाच्या पंचकुलामध्ये नदीजवळ उभी असलेली कार मुसळधार पावसात वाहून गेली. मीडिया रिपोर्टनुसार पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ही कार वाहून गेली, या कारमध्ये एक महिला बसलेली होती. ही वाहून गेलेली कार नदीच्या प्रवाहात अडकली. हे पाहून काही स्थानिक तरुणांनी दोरीच्या सहाय्याने वाहत्या पाण्यात उतरून कारमधील महिलेचा जीव वाचवला. या महिलेला वाचवल्यानतंर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. (Breaking News)

रमणदीप सिंह मान @ramanmann1974 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "ही खर्क मांगोली पंचकुला आहे. येथे एका महिलेची कार नदी जवळच उभी असताना अचानक जास्त पाण्याच्या प्रवाहामुळे नदीत वाहून गेली. तिच्या बचावासाठी आलेल्या लोकांना सलाम. ती महिला तिच्या आईसोबत एका मंदिरात दर्शनासाठी आली होती." (Marathi Tajya Batmya)

Youth Saves Woman From Flood  In Haryana
Pankaja Munde News: पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की, ज्या स्थानिक लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिलेचे प्राण वाचवले ते अभिनंदनास पात्र आहेत. नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद आणि गाझियाबादच्या शेजारच्या भागांसह दिल्ली-एनसीआरमध्येही लक्षणीय पाऊस झाला, तर पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे तापमान काही अंशांनी खाली आले आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिल्लीत रविवारी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने (RWFC) यमुनानगर, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनीपत, रोहतक, मेरठ, हापूर आणि बुलंदशहर यासह दिल्ली-NCR मध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com