Pankaja Munde News: पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Amol Mitkari on Pankaja Munde: "पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. याबाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहीत आहे"
Amol Mitkari on Pankaja Munde
Amol Mitkari on Pankaja MundeSaam TV
Published On

Amol Mitkari on Pankaja Munde: पंकजा मुंडे यांना भाजपकडून जाणीवपूर्वक डावललं जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असून लवकरच मोठा निर्णय घेतील, अशा उलट सूलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, शुक्रवारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पंकजा मुंडेंना पक्षात प्रवेश केल्यास मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली, असं असताना आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या एक खळबळजनक दावा केला आहे.

Amol Mitkari on Pankaja Munde
Aditya Thackeray on Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा अपेक्षित नाही, शिंदेच्या त्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे संतापले

पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. याबाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहीत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. धाराशीव येथे टीव्ही ९ मराठीसोबत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

पंकजा मुंडे यांची नाराजी आणि बीआरएसकडून दिलेल्या ऑफरबाबत विचारलं अमोल मिटकरी यांना प्रश्व विचारण्यात आला. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, “मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंची (Pankaja Munde) भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे".

Amol Mitkari on Pankaja Munde
Maharashtra Monsoon 2023: अखेर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याची माहिती, पुढील २४ तास धोक्याचे

काल-परवाच साखर कारखान्याची निवडणूक झाली, तेव्हा दोघंही बहीण-भाऊ (पकंजा मुंडे व धनंजय मुंडे) सामंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे बीआरएसची ऑफर स्विकारणार?

"बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागलीत, असं मला वाटतं नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचं महाराष्ट्रात भविष्य चांगलं नाही. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल", असंही मिटकरी म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com