Maharashtra Politics: 'जे भाषणात, तेच विधानसभेत आणि मुलाखतीत...' उद्धव ठाकरेंच्या पॉडकास्टवरुन 'मनसे'ची खोचक टीका

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray Podcast: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बहुचर्चित 'आवाज कुणाचा' पॉडकास्ट आज प्रसिद्ध झाले.
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeSaam TV
Published On: 

Maharashtra Political News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बहुचर्चित आवाज कुणाचा पॉडकास्ट आज प्रसिद्ध झाले. या पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडावर कडक शब्दात टीका केली तसेच राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.

ठाकरेंच्या या पॉडकास्टची सर्वत्र चर्चा होत असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या मुलाखतीवरुन उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांवर निशाणा साधला आहे...

Sandeep Deshpande
Kolhapur News: कोल्हापूरकरांनी घेतला महापुराचा धसका; महापुराच्या भीतीनं वाहनं रस्त्यावर लावली!

काय म्हणाले संदीप देशपांडे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पॉडकास्ट मुलाखतीवर जोरदार टीका केली आहे. "जे भाषणात तेच विधानसभेत तेच पत्रकार परिषेदेत आणि तेच मुलाखतीत नवीन काहीच नाही.. असो आज मा.बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबश्या काढायला लावल्या असत्या;" असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

भाजपचाही हल्लाबोल...

तसेच उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत... ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर;" असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

"भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस. हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस.. असेही या ट्वीटमध्ये त्यांनी म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.