

रणजीत माजगावकर
Kolhapur News Today: गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर पुराचं सावट घोंगावत आहे. या पुराचा धसका कोल्हापूरकरांनी घेतलेला आहे. 2019 आणि 2021 यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता.
यामध्ये कोल्हापूरकरांची शेकडो वाहन पाण्यात बुडून खराब झाली होती. कोल्हापूरकरांनी महापुराचा चांगलाच धसका घेतल्याने पूर येणे अगोदरच खबरदारी म्हणून कोल्हापूरकरांनी आपली वाहन रस्त्यावर आणून लावण्यास सुरुवात केलेली आहे. (Latest Marathi News)
2019 ला आलेल्या महापुराचे पाणी थेट कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलं होतं. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पहिला मजला पूर्णपणे जलमय झाला होता. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपलं कार्यालय दुसऱ्या मजल्यावर हलवण्याच्या सूचना दिल्या आणि कालपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. (Kolhapur Rain)
आता चक्क जिल्हाधिकारीच स्थलांतरित होत आहेत, म्हटलं तर मग सामान्य कोल्हापूरकरांचे काय. आंबेवाडी, प्रयाग, चिखली या गावांना पुराचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या गावातील नागरिकांना ताबडतोब गाव सोडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आपली जनावर, प्रापंचिक साहित्य घेऊन स्थलांतरित होत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) पडतोय. तर धरण क्षेत्रामध्ये अति मुसळधार पावसाची नोंद होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झालेले आहेत. तर अनेक ठिकाणी लोकांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या परिसरात पुराचा फटका बसतो, त्या तब्बल 27 गावांमधील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. पुढील काही काळात जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र कोल्हापूरकरांना महापुराला सामोरे जावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.