अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Pune News: सध्या राज्यभरात पाऊस सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. अशाच वेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे विक्री होत असल्याचे समोर आले होते, ज्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले.
याच पार्श्वभूमीवर पुणे कृषी आयुक्तांकडून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता व्हाट्सॲप क्रमांक जाहीर कार्यान्वित करण्यात आला आहे. ज्यामार्फत बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ होणार करण्यासाठी वॉट्सअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
तसेच कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ तास कार्यरत असेल. त्याचप्रमाणे शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात.. असेही सांगण्यात आले आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे...
दरम्यान, राज्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून या खरीप हंगामात २४ जुलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी म्हणजे सरासरी ९९ टक्के पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील राज्याचे पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून २४ जुलै २०२३ अखेर प्रत्यक्षात ११४.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर ८१ टक्के पेरणी झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.