No-Confidence Motion: संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता! विरोधक मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार

Manipur Incident: मणिपूर हिंसाचाराचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना पाहायला मिळत आहेत.
Amit Shah Narendra Modi
Amit Shah Narendra Modi Saamtv
Published On

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Parliament Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ज्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session) उमटताना पाहायला मिळत आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेमध्ये निवेदन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

त्यामुळेच आज केंद्र सरकारविरोधात लोकसभेतअविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. याबाबतची माहिती लोकसभेचे विरोधी पक्षनेते रंजन चौधरी यांनी दिली आहे.

Amit Shah Narendra Modi
Nanded News: अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात उतरवू; शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदारांना धमकी, VIDEO व्हायरल

याबाबत अधिक माहिती अशी की, मणिपूर हिंसाचारावरुन (Manipur Incident) संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवेदन करण्याच्या मागणीसाठी मोठा गदारोळ सुरु केला. मात्र सरकारकडून निवेदनास टाळाटाळ होत असल्याने विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाणार आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikaarjun Kharge) यांच्या संसदेतील दालनात मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अविश्वास ठराव मांडण्यावर सहमती झाली आहे. त्यानुसार आज सकाळी 10 वाजता लोकसभेत विरोधी पक्षाकडून अविश्वास प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तसेच या अविश्वास प्रस्तावाला सर्व विरोधी पक्ष समर्थन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Amit Shah Narendra Modi
Solapur News: शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

दिल्ली सरकार विरोधातील अध्यादेशाला मंजुरी

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी दिल्ली अध्यादेशाला विधेयकाच्या रूपात संसदेत मांडण्यासाठी मंजुरी दिली आहे. विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी ही केवळ औपचारिकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com