ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Shivsena 2 Senior Leaders Joins BJP: नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दोन वरिष्ठ नेते भाजपसोबत जाणार. काँग्रेसचे काही माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांचाही भाजप प्रवेश.
Uddhav Thackeray Shivsena UBT
Uddhav Thackeray Shivsena UBTx
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरले असताना, सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कुठे अंतर्गत वाद उफाळून येत आहेत, तर कुठे नेते स्वेच्छेने पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. माजी उपनेते आणि माजी महानगर प्रमुख मशालची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेणार आहेत.

भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे शिलेदार भाजपसोबत जाणार आहेत. माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे आज भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray Shivsena UBT
Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुत

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. यासह काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी देखील भाजपसोबत जाणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह गुलाब भोये आणि माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे. यापक्षप्रवेशामुळे भाजप अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray Shivsena UBT
'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com