Maharashtra Politics : सोलापुरात काकाच्या विरोधात पुतण्याने दंड थोपाटले, शिंदे घराण्यात राजकीय संघर्ष

Madha Vidhansabha Matadar Sangh: सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सोलापूरमध्ये काका-पुतण्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे.
Maharashtra Politics : सोलापुरात काकाच्या विरोधात पुतण्याने दंड थोपाटले, शिंदे घराण्यात राजकीय संघर्ष
Madha Vidhansabha Matadar SanghSaam Tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सोलापूरमध्ये काका-पुतण्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे. सोलापूरातील प्रसिद्ध शंदे घराण्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्याने दंड थोपाटले. शरद पवारांनी माढा मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमदेवार बबनदादा शिंदे यांच्या घरातून शोधला आहे. धनराज शिंदे यांनी नुकताच विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतणे धनराज शिंदे यांनी बंड केले. धनराज शिंदे आमदार असणारे काका बबनराव शिंदे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Maharashtra Politics : सोलापुरात काकाच्या विरोधात पुतण्याने दंड थोपाटले, शिंदे घराण्यात राजकीय संघर्ष
Maharashtra Politics : विधानसभेची मस्ती, बाप-लेकात कुस्ती? कोण जिंकणार राजकीय सामना, पाहा VIDEO

मानेगाव येथे धनराज शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा धनराज शिंदे यांनी केली. आमदार बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप होता. दरम्यान, मागच्या महिन्यामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनी शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यावेळी ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी या भेटीदरम्यान शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे म्हटले जात होते.

Maharashtra Politics : सोलापुरात काकाच्या विरोधात पुतण्याने दंड थोपाटले, शिंदे घराण्यात राजकीय संघर्ष
Maharashtra Politics : विधानसभेची मस्ती, बाप-लेकात कुस्ती? कोण जिंकणार राजकीय सामना, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com