Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना खतम करण्याची भाषा करतात त्यांना नीट झोडले जाईल, महाराष्ट्रात सगळ्या माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून महायुतीवर टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार
Amit Shah on Uddhav Thackeray and Sharad PawarSaam Tv
Published On

मुंबई, ता. २७ सप्टेंबर

Saamana Editorial On Amit Shah: विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमित शहांनी निवडणुकीची रणनिती मांडताना आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचे आहे, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्याला उद्धव ठाकरे, शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे, असंही ते म्हणाले. अमित शहा यांच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाने चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना खतम करण्याची भाषा करतात त्यांना नीट झोडले जाईल, महाराष्ट्रात सगळ्या माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून महायुतीवर टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार
Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

काय आहे सामना अग्रलेख?

गृहमंत्री अमित शहा यांनी नाशकातील त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, "फोडा, झोडा; पण निवडणुका जिंका." महाराष्ट्रात पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले आहेत. व स्वतः गृहमंत्री शहादेखील महाराष्ट्र हातचा जातोय या भयाने खचले आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडा. त्यांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडा व या पक्षांचा पाया जमीनदोस्त करा. काहीही करा, पण निवडणुका जिंका, असे अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले.

शहा यांची भाषा लोकशाहीला धरून तर नाहीच, पण सभ्यपणाचीदेखील नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार पन्नास-पन्नास कोटींना विकत घेतले. देशाचे गृहमंत्री अशा भ्रष्ट लोकांच्या मदतीने महाराष्ट्रात घटनाबाहय सरकार चालवत आहेत. 40-40 आमदार फोडूनदेखील महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मिंधे टोळीचा दारुण पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. महाटी जनतेने मोदी-शहांच्या भ्रष्ट राजकारणाला अक्षरशः लाथाडले. म्हणजे त्या शहा-मोदींनी फांद्या छाटल्या तरी दोन्ही पक्षांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते व मतदार 'पवार-ठाकरे' यांच्या बरोबरच राहिले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीआधी बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडण्याची माजोरडी भाषा करतात, असा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार
Pune Crime: करणी केली आर्थिक प्रगती होत नाही; मग संधी साधत डोक्यात घातला दगड,भोर तालुक्यात घडला भयानक प्रकार

महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अमित शहांचे हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमानशून्य मिंधे टोळी करत आहे व त्यांना नाशकात हे डोहाळे लागले.

नाशकात श्राद्ध, अंत्यसंस्कार, नारायण नागबळी यासारखे विधी केले जातात. शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागले आहेत त्यांचे क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार मन्हाटी जनतेने केला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल. महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो, अशी जहरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

Maharashtra Politics: 'शरद पवार, उद्धव ठाकरेंना खतम करण्याचे डोहाळे', अमित शहांच्या वक्तव्याचा 'सामना'तून समाचार
Accident News : दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चारजण गंभीर, मृतांमध्ये पाचोऱ्यातील एकाचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com