Maharashtra Assembly Election: राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राज्यात दाखल झाली आहे. यातच दोन दिवसात राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल
Election Commission of India Team Saam Tv
Published On

राज्यात विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच आज रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, सहआयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस एस संधू यांच्यासोबत इतर अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल
Maharashtra Politics: मित्रपक्षांना पाडलं तर भाजपच्या हातातून सत्ता जाईल, अमित शहा यांची कार्यकर्त्यांना कानपिचक्या; VIDEO

सोबतच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते. याच पत्रकार परिषदेत राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची २७ आणि २८ सप्टेंबर असे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार आहे. राज्यात निवडणुका निःपक्षपाती पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली, असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल
Chhagan Bhujbal Health: मंत्री छगन भुजबळ यांची अचानक तब्येत बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

दरम्यान, राज्यात २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेची मुदत पूर्ण होत आहे. या मुदतीआधी राज्यात विधानसभा निवडणूक झाली पाहिजे, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोग कामाला लागलं आहे. यातच शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणुकीच्या तारखेची घोषणा होणार का, याची उत्सुकता अनेकांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com