Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकीट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...

Harshvardhan Patil Join NCP Sharad Pawar Group: इंदापूर येथील जाहीर सभेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकिट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
Harshvardhan Patil Join NCP Sharad Pawar GroupSaam Tv
Published On

माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी मोठा निर्णय घेत आज तुतारी हाती घेतली. भाजपची (BJP) साथ सोडत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. इंदापूर येथील जाहीर सभेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यावेळी भाषण करता हर्षवर्धन पाटील यांनी 'कुठलीही जबाबदारी द्या. मी शब्दाला पक्का आहे.', असा शब्द शरद पवारांना दिला.

हर्षवर्धन पाटील यांनी भाषण करताना सांगितले की, 'येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जी जबाबदारी द्यायची ती द्या. माझी तयार आहे. कुठलीही जबाबदारी द्या. मी शब्दाला पक्का आहे. लोकशाहीत पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ असते. जनतेने सांगितल्यामुळे मी निर्णय घेतला.', तसंच, 'व्यक्तीगत स्वार्थासाठी मी राजकारण करत नाही. काही मिळावं म्हणून निर्णय घेतला नाही. आत बाहेर करणाऱ्यातला मी नाही.', असं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, 'शरद पवार बिग बॉस आहेत. सुप्रिया सुळे यांची जबाबदारी मोठी आहे. कारण मी बारामतीचा जावई आहे. सुप्रिया सुळेंनी निर्धास्त राहावे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत २ तास चर्चा केली. त्यांनी त्यांची अडचण सांगितली. आता आम्ही इंदापुरपूरतं मर्यादीत नाही. पवारांच्या कुटुंबासोबत आमचे आता कौटुंबिक संबंध आहेत.'

Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकिट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
Maharashtra Politcs : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळणार?

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील यांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. इंदापूर येथील मार्केट कमिटी येथील मैदानावर घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हातामध्ये घेतली. या सभेसाठी ३० ते ३५ हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या सभेत बॅनर घेऊन कार्यकर्ते आले होते. 'मलिदा गँग हटवा, हर्षवर्धन भाऊंना विधानसभेत पाठवा', अशा आशयाचे बॅनर झळकले. तसंच, 'बाप तो बाप रहेगा' असा उल्लेख असलेले शरद पवार यांचे बॅनर झळकले.

Harshvardhan Patil: इंदापूरमधून आमदारकीचं तिकिट कुणाला? शरद पवारांसमोरच हर्षवर्धन पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले...
Amravati Politcs : नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार?, कमळ चिन्हावर निवडणूक लढणार?; सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com