Maharashtra Politics: विधानसभेत बंडखोरी रोखण्यासाठी रामबाण उपाय; आठवडाभरात १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय?

Maharashtra Politics: आचारसंहितेच्या आधीच १२ आमदारांच्या बाबत अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीमध्ये १२ जागांची बंडखोरी रोखण्यासाठी या आमदारांच्या नेमणूकीचा रामबाण उपाय शोधल्याचे सांगण्यात येत आहे.
 Maharashtra Politics: ब्रेकिंग! राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मोर्चेबांधणी! आचारसंहिता लागण्याआधी निर्णय होणार
MahayutiSaam Tv
Published On

वैदेही कानेकर| मुंबई

Maharashtra Politics: राज्यामध्ये महाविकास आघाडीचे होते सरकार सत्तेत होते तेव्हापासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नेमणूक रखडली आहे. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून आचारसंहितेच्या आधीच १२ आमदारांच्या बाबत अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीमध्ये १२ जागांची बंडखोरी रोखण्यासाठी या आमदारांच्या नेमणूकीचा रामबाण उपाय शोधल्याचे सांगण्यात येत आहे.

 Maharashtra Politics: ब्रेकिंग! राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मोर्चेबांधणी! आचारसंहिता लागण्याआधी निर्णय होणार
Pune Crime: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार, बोपदेव घाटातील घटना; पुणे हादरलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या साडे ४ वर्षांपासून १२ आमदारांच्या नेमणूकीवरून जोरदार राजकारण सुरु आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हा निर्णय प्रलंबित आहे. अशातच विधानसभेच्या तोंडावर आता १२ आमदारांच्या बाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक जाहिर होण्यापूर्वीच महायुतीकडून यावर निर्णय होणार आहे.

महत्वाचं म्हणजे सध्या जागा वाटपावरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अनेक मतदार संघांमध्ये तिन्ही पक्षांनी दावे केल्याने नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी बंडाचे झेंडेही फडकत आहेत. त्यामुळे या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभेच्या १२ जागांची बंडखोरी रोखण्यासाठी या आमदारांची नेमणूकीचा रामबाण उपाय शोधण्यात आला आहे.

 Maharashtra Politics: ब्रेकिंग! राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मोर्चेबांधणी! आचारसंहिता लागण्याआधी निर्णय होणार
Maharashtra Politics : शरद पवारांनी पुन्हा डाव टाकला, ५२ जागांवर उमेदवार हेरले, पाहा संभाव्य यादी

दरम्यान, महाविकास आघाडी सत्तेत असताना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव दिला होता. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही त्याला मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टातही गेले. मात्र मधल्या काळात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. तेव्हापासून ही नियुक्ती रखडली होती. मात्र आता लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

 Maharashtra Politics: ब्रेकिंग! राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मोर्चेबांधणी! आचारसंहिता लागण्याआधी निर्णय होणार
Maharashtra Politics: आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची ऑफर, अजित पवार गटात अस्वस्थता; शिंदेसेनेला झुकते माप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com